सध्या चर्चेत असलेल्या अभिनेत्रीनंपैकी एक अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे. ती तिच्या मोहक अदांजाने कायमच प्रेक्षकांचं मन जिंकते. तसेच नांदा सौख्यभरे या मालिकेने तिला ओळख मिळवून दिली. या मालिकेत ती इतर नायिकानं सारखी सोशिक दाखवली नव्हती. त्या मूळे तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या आवडीची ठरली.(Rutuja Bagwe And Onkar Raut)
तर अनन्या या नाटकात तिच्या दमदार अभिनय कौशल्याने तिने प्रेक्षकांच्या मनात कायमच स्थान मिळवलं.अनन्या या नाटकात तिच्या अभिनयाचा कस लागला असं म्हंटल तरी काही वावगं ठरणार नाही.हात नसताना सगळं मॅनेज करत सी.ए सारखी कठीण परीक्षा पास करणं त्या अनन्याच्या स्ट्रगलला ऋतुजाने पुरेपूर न्याय दिलेला आहे.या नाटकाचे ३०० पेक्षा जास्त प्रयोग झाले आहेत.
पहा काय होती ओंकार राऊत ची कमेंट (Rutuja Bagwe And Onkar Raut)
तिच्या कामाव्यतिरिक्त तिचे हटके फोटोज, रिल्स यांमुळे ती कायम प्रेक्षकांच्या नजरेत राहते. तिच्या या फोटोज, रिल्स ना प्रेक्षक कायमच भरभरून दाद देतात. ऋतुजाने नुकताच प्रिटी पिंक असे कॅप्शन देत एका ट्रेंडिंग गाण्यावरचा रील शेअर केला आहे. त्यात तिने गुलाबी रंगाचा वन पीस घातलेला आपल्याला पहायला मिळतोय.यात ती फारच सुंदर दिसतेय. तिच्या या रील वर अनेक लाईक, कमेंट आल्या आहेत. प्रेक्षकांसोबत अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर, भक्ती देसाई, आकांक्षा घाडे यांनी देखील कमेंट करून तिचे कौतुक केले आहे. परंतु या सगळ्या मध्ये एका कमेंट ने मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ऋतूजा च्या या रील वर हास्यजत्रा फेम ओंकार राऊत याने मी कमेंट न केलेलीच बरी अशी कमेंट केली आहे. यावर ऋतुजाने अगदी मिश्किल अंदाजात रिप्लाय केला आहे कि, तुझी कमेंट पण न्यूज होते यार, तू तो बडा आदमी बन गया. या वरून ऋतुजा आणि ओंकारचं बॉण्डिंग कळून येत.(Rutuja Bagwe And Onkar Raut)
ऋतुजा असे अनेक ग्लॅमर्स, बोल्ड, ट्रेडिशनल फोटोज रील तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून पोस्ट करत असते. प्रेक्षकांना तिचा हा अंदाज देखील तितकाच भावतो. तिच्या या फोटोजवर देखील लाईक्स आणि कमेंट मधून त्याचं प्रेम व्यक्त करतात.