आज संपूर्ण देशभरात रामनवमी उत्साहात साजरी करण्यात येत आहे. अशातच नव्याने बांधण्यात आलेल्या आयोध्यायेथील राम मंदिरामध्ये रामनवमीचा उत्सव आनंदात साजरा करण्यात येत आहे. अशातच आता दुपारच्या वेळी राम लल्लाच्या कपाळावर सूर्य तिलक आल्याने भक्तांनी आनंद व्यक्त केला आहे. तब्बल 500 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर आयोध्येमध्ये भव्य राममंदिर उभारण्यात आले आहे. तसेच आता विज्ञानाच्या मदतीने रामनवमीच्या निमित्ताने दुपारी 12 वाजता सूर्य किरणं भगवान रामाच्या कपाळावर पडतील अशी व्यवस्था केली आहे. यासाठी सर्व देशभरातील सर्व भक्त खूप वाट बघत होते. (ayodhya rammandir surya tilak)
रामनवमीच्या निमित्ताने आयोध्येतील राममंदिरात एक अद्भुत घटना पाहायला मिळाली. दुपारी १२ वाजता पण हे नेमकं कसं झालं हे आता जाणून घेऊया. यासाठी अष्टधातूचे ६५ फुट लांब २० पाइप लावले आहेत. यामध्ये फिल्टरदेखील लावले आहेत. यामुळे मूर्तीला उष्णता लागत नाही. तसेच या मंदिरामध्ये लेन्स व आरसेही लावले आहेत. यामुळे दुपारची सूर्यकिरणे मूर्तीच्या थेट डोक्यावर पडतात.विज्ञानाचा वापर करुन ५.८ सेंटीमीटर प्रकाश किरणे भगवान रामाचे सूर्य तिलक केले.
लावलेल्या आरशाची व लेन्सचा दर्जा खूप उत्तम आहे.लावण्यात आलेल्या पाईपांना आतून काळा रंग लावण्यात आला आहे. यामुळे सूर्यप्रकास जशाच तसा राहतो. सूर्याची उष्णता मूर्तीच्या कपाळावर पडण्यापासून रोखण्यासाठी एक इन्फ्रारेड फिल्टर ग्लासचा वापर करण्यात आला आहे.
या संपूर्ण बांधकामाध्ये वैज्ञानिकांची महत्त्वाची भूमिका आहे. या वैज्ञानिकांमध्ये सीबीआरआय, रुडकी व भारतीय खगोल भौतिक संस्था, बंगळुरूमधील वैज्ञानिकांचाही समावेश आहे. या टीमने सौर ऊर्जेच्या स्थापित सिद्धांतांचा वापर करुन मंदिरातील तिसऱ्या मजल्यावरुन गर्भगृहापर्यंत सूर्यकिरणांची थेट एक रष तयार होईल अशी व्यवस्था केली आहे. भारतीय खगोल भौतिक संस्थेमार्फत तांत्रिक सहाय्यता व बंगळुरूमधील कंपनी ऑप्टिकाने या प्रक्रियेमध्ये पूर्णपणे मदत केली आहे.
दरम्यान या अद्भुत घटणेमुळे सर्वांनाच आश्चर्य झाले. तसेच रामनवमीच्या निमित्ताने एक खास भेट रामभक्तांना पाहायला मिळाली.