महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची जोडी कायम चर्चेत असते. या दोघांकडे ‘पॉवर कपल’ म्हणून पाहिलं जातं. देवेंद्र यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची गायिका म्हणून ओळख सर्वांनाच झाली आहे. अमृता फडणवीस या बँकर असण्याशिवाय गायिका म्हणून विशेष सक्रिय आहेत. त्यांनी आतापर्यंत मराठी, हिंदी, इंग्रजी आणि पंजाबी भाषेतील अनेक गाणी गायली आहेत. सोशल मीडियावरही त्या बऱ्यापैकी सक्रिय असतात. (Amruta Fadnavis Troll)
अमृता त्यांची गायनाची आवड नेहमीच जोपासताना दिसतात. अशातच यंदाच्या राम नवमीनिमित्त अमृता यांचं नवीन गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. “हे राम” हे नवं गाणं यंदाच्या रामनवमीनिमित्त प्रदर्शित झालं आहे. हे गाणं गायक कैलास खैर आणि गायिका अमृता फडणवीस यांनी गायलं आहे. अमृता यांनी या गाण्याचा व्हिडीओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट केला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केलेल्या पाहायला मिळत आहेत.
अमृता यांनी याआधी देखील बरेचदा ट्रोल करण्यात आलं आहे. गाण्यांचे व्हिडीओ व अनेक हटके फोटोशूट शेअर करताच त्यांना अनेकदा नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. अशातच रामनवमीनिमित्त शेअर केलेल्या एका व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत अमृता यांना चांगलंच ट्रोल केलं आहे. यावर एका नेटकऱ्याने कमेंट करत, “हे राम !! आताच झोपेतून उठले होते, आता परत झोपते”, असं म्हटलं आहे. तर एकाने, “कशाला वाट लावता मामी देवाच्या नावाची”, असं म्हणत ट्रोल केलं आहे.
याशिवाय काही नेटकऱ्यांनी, “तुमचं गाणं ऐकून प्रभू श्रीराम पुन्हा वनवासाला जातील. कशाला नाही जमत ती थेरं करता”, “प्रभू रामभक्त आहे म्हणून शांत आहे”, “मॉडेलिंगपर्यंत ठीक होतं पण गायन करणं गरजेचं आहे का?”, असं म्हटलं आहे. याशिवाय अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत तिला चांगलंच ट्रोल केलं आहे.