लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री व ‘बिग बॉस १४’ ची विजेती रुबिना दिलैक नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या रुबिना तिच्या मातृत्वाचा आनंद लुटताना दिसत आहे. अभिनेत्रीने गेल्या वर्षी जुळ्या मुलींना जन्म दिला. गेल्या वर्षी रुबिना व अभिनव आई-बाबा झाले. लग्नाच्या ५ वर्षांनंतर आई झाल्याचा आनंद रुबिनाच्या चेहऱ्यावर नेहमीच पाहायला मिळतो. अभिनेत्री आपल्या मुलींची खूप काळजी घेत असते. अलीकडेच तिने ‘किसी ने बताया नही’ या पॉडकास्टच्या दुसऱ्या सीझनमध्ये आई झाल्यानंतरचा अनुभव शेअर केला. (Rubina Dilaik Daughter Incident)
या पॉडकास्टमध्ये रुबिना दिलैकने खुलासा केला आहे की, एके दिवशी तिची मुलगी इधाबरोबर घरी अपघात झाला. अभिनेत्रीने सांगितले की, “तिची मुलगी इधा झोपली असताना बेडवरुन खाली पडली होती”. रुबिना दिलैकने खुलासा केला की, “एके दिवशी इधा बेडवर स्वतःची बाजू बदलत होती आणि त्याच दरम्यान ती बेडवरुन खाली पडली. त्यावेळी मी शूटिंगवर होते. पण इधा बद्दल ऐकल्यावर मला खूप भीती वाटली. देवाच्या कृपेने तिला काहीही दुखापत झाली नाही आणि ती पूर्णपणे बरी आहे. काही दिवसांपूर्वीच हा प्रकार घडला होता”, असंही ती म्हणाली.
या पॉडकास्टदरम्यान रुबिनाने असेही सांगितले की, जुळ्या मुली झाल्यानंतर तिची स्मरणशक्ती खूपच कमकुवत झाली आहे. ती एका मुलीला खायला देते आणि तिने कोणाला आणि कधी दिले हे पुन्हा ती विसरते. अभिनेत्री याबाबत खुलासा करत म्हणाली, “आईचे मन पूर्णपणे कोरं असतं. मुलांमध्ये असताना तिला खरंच काही आठवत नाही हे अगदी खरं आहे. हे माझ्याबरोबर अनेकदा घडले आहे. सुरवातीला मी कोणाला जेवायला दिले हे विसरायचे. त्यानंतर माझ्याकडे एक डायरी आहे ज्यात मी कोणाला किती वाजता खायला दिले याची नोंद करु लागले. जसे की इधाला २:४५ वाजता आणि जीवाला ३:३० वाजता खायला दिले होते”.
रुबिनाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, रुबिना दिलैक अलीकडेच पंजाबी चित्रपट ‘चल भच चली’मध्ये दिसली होती. हा चित्रपट ५ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.