निवेदिता सराफ आणि अशोक सराफ या परिपूर्ण जोडीबद्दल बोलावं तितकं कमी. बऱ्याच चित्रपटांतून एकत्र काम करत करत ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र आली. सिनेसृष्टीतील एक काळ या जोडीने चांगलाच गाजवला. आज अशोक मामा आणि निवेदिता यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सध्या ही जोडी एकत्र काम करताना दिसत नाही आहे त्यामुळे या जोडीला चाहते एकत्र पाहायला उत्सुक आहेत. निवेदिता सराफ यांनी नुकताच त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ एअरपोर्टवरील आहे.(Nivedita Saraf At Airport)
निवेदिता यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमधून हे कळतंय की, त्या वैक्युम क्लिनर या नाटकाच्या प्रयोगाच्या दौऱ्यानिमित्त परदेशात गेल्या आहेत. सिडनी आणि मेलबर्न येथे होणाऱ्या नाटकांच्या प्रयोगासाठी व्हॅक्युम क्लिनरची संपूर्ण टीम निघाली आहे. या व्हिडिओमध्ये निवेदिता सराफ यांच्यासोबत अशोक सराफ, निर्मिती सावंत आणि नाटकाची इतर टीम पाहायला मिळतेय. चाहत्यांनी त्यांच्या या व्हिडिओवर कमेंट करत सेफ जर्नी असं म्हटलं आहे. सोबत नाटकाची इतर टीमही दिसतेय.
पाहा निवेदिता नेमकं कोठे चालल्या आहेत (Nivedita Saraf At Airport)
वैक्युम क्लिनरच्या टीमसोबत निवेदिता या देखील परदेश दौरा करण्यात व्यस्त आहेत. सध्या निवेदिता या भाग्य दिले तू मला या मालिकेत रत्नमाला मोहिते ही भूमिका साकारत आहेत. मात्र मालिकेतून ब्रेक घेत त्या सध्या परदेशात नाटकांच्या प्रयोगानिमित्त गेल्या आहेत. मालिकेत त्या तीर्थयात्रेला गेल्या आहेत असं दाखवण्यात आलं आहे.(Nivedita Saraf At Airport)
हे देखील वाचा – रायाच्या मृत्यूचं खापर मधुराणी फोडणार सिंधूवर?
काही दिवसांपूर्वीच निवेदिता यांनी त्यांचा लंडन येथील फोटो शेअर केला होता. त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. मालिकेत तीर्थयात्रेला जातेय असं दाखवून निवेदिता या थेट लंडनस्वारी करण्यात व्यस्त असल्याने चाहत्यांचा कमेंट करण्याचा मोह आवरला नाही आहे.
