कलाकार मंडळी हे त्यांच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढून शॉपिंगला जातात. बरेचदा ही कलाकार मंडळी शॉपिंग करतानाचे फोटोस, व्हिडीओज सोशल मीडियावरून शेअर देखील करतात. अशातच सर्वांच्या लाडक्या आणि ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ या त्यांच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढून खरेदीसाठी गेल्या आहेत. मात्र यावेळी त्यांनी खरेदी किंवा मॉलचे कोणतेही फोटो न पोस्ट करता एक गंभीर बाब चाहत्त्यांसोबत सोशल मीडियावरून शेअर केली आहे. मॉल मध्ये शॉपिंगला गेल्यांनतर त्यांनी तेथे आलेल्या एका वाईट अनुभवाबाबत भाष्य केलं आहे.(Nivedita got angry)
पाहा का निवेदितांनी सुनावले खडेबोल (Nivedita got angry)
मॉल मधील स्वतःची एक सेल्फी पोस्ट करत त्याखाली त्यांनी त्यांना आलेल्या वाईट अनुभवद्दल परखडपणे भाष्य केलं आहे. ‘नमस्कार मी इन्फिनिटी 2 मालाडमधील MAX दुकानात आले आहे. तेथे मला खूप वाईट अनुभव आला. येथील कर्मचारी वर्ग हा मैत्रीपूर्व नाहीय. त्यांना तुम्ही काही विकत घ्या किंवा नका घेऊ याची पर्वा नाही. ते मदत करायला तयार नव्हते, जेव्हा मी मदत मागितली तेव्हा एक मुलगी बाहेर आली मात्र तिने दुसर्या सेल्समनला सांगितले की तिच्याकडे वेळ नाही.
हे देखील वाचा – जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयेशा श्रॉफची झाली फसवणूक- ५८ लाख रुपयांना बसला फटका
त्यानंतर जेव्हा एका व्यक्तीने मला ओळखले तेव्हा त्यांनी माझी माफी मागायला सुरुवात केली आणि मॅनेजरला फोन केला. मला याप्रकारे चांगली ट्रीटमेंट नको होती कारण मी एक ओळखीचा चेहरा आहे मला चांगली ट्रीटमेंट हवी आहे कारण मी एक सामान्य ग्राहक आहे. आणि त्या दुकानात पाऊल टाकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे योग्यरीत्या लक्ष दिल गेलं पाहिजे.(Nivedita got angry)
निवेदिता यांना शॉपिंग दरम्यान आलेल्या या अनुभवावरून त्यांनी परखड मत मांडलं आहे.