मराठी सिनेसृष्टी उत्कृष्ट अभिनेत्रींनी बहरली आहे.सध्या अनेक नवनवीन अभिनेत्री सिनेसृष्टीमध्ये त्यांचं स्थान निर्माण करत आहे. पंरतु या नवीन चेहऱ्यांमध्ये आजही प्रेक्षकांच्या त्या लाडक्या अभिनेत्री हरपल्या नाहीत. बऱ्याच काळापासून प्रेक्षकांचं उत्स्फूर्त मनोरंजन करत आहेत. देऊया त्या अभिनेत्रींच्या तरुणपणीच्या आठवणींना उजाळा.(Marathi Actress young Photos)
पाहा लाडक्या अभिनेत्रींचे तरुणपणीच्या फोटोजची झलक(Marathi Actress young Photos)
सध्या मराठी मालिकांमधली बेस्ट आई म्हणजेच अभिनेत्री निवेदिता सराफ. निवेदिता सराफ सध्या अनेक मालिकांमध्ये आईची भूमिका साकारताना पाहायला मिळतात. तर भाग्य दिले तू मला या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतात.
मालिकेत आई ची भूमिका साकारताना त्या सहकालाकरच्या खरंच आई होऊन जातात, हा त्यांच्या सोबत काम करणाऱ्या प्रत्येकाचा अनुभव आहे. अशी ही बनवा बनवी,माझा छकुला, धुमधडाका जितकी नाव घेऊ तितकी कमी पडतील पाहूया निवेदिता यांच्या तरुणपणीचे काही फोटोज.
सगळ्यांच्याच घरून अभिनय क्षेत्रात जाण्यासाठी परवानगी मिळत नाही, तरीही घरच्यांची परवानगी मिळून या क्षेत्रात ती आली आणि तिने जिंकून घेतलं अशी महाराष्ट्राची वंडर गर्ल म्हणजे अभिनेत्री वर्षा उसगावकर.
नव्वदीच्या दशकात त्यांनी आपल्या सौंदर्यने आणि अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलं. एक काळ वर्ष उसगावकर यांच्या नावावर कोरला गेला आहे.चित्रपट,मालिका प्रत्येक माध्यमांत त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवला आहे.आज हि त्या त्याच उत्साहाने काम करतात. सुख म्हणजे नकी काय असत या मालिकेत माईंच्या भूमिकेत वर्षा पाहायला मिळतात. चला तर मग पाहुयात वर्षा यांच्या तरुणपणीचे काही फोटो.
चित्रपट,नाटक,मालिका सर्व माध्यमांत त्यांनी त्यांच्या कामाची छाप पाडली.आजही चेहऱ्यावर तेच तेज आणि हसू असणारी अभिनेत्री म्हणजे किशोरी शहाणे. चला पाहुयात त्यांच्या तरुणपणीच्या फोटोजची खास झलक.
वयाला ब्रेक देत त्या मराठी बिग बॉस सीजन २ मध्ये पाहायला मिळालं.आणि त्याच उत्साहाने खेळल्या.(Marathi Actress young Photos)
हे देखील वाचा : शॉपिंगदरम्यान निवेदिता यांना मिळाली गैरवागणूक पोस्ट करत भडकल्या निवेदिता