मराठी चित्रपटसृष्टीत बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांसारख्या अनेक राजकीय नेत्यांच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. अशातच आता देशाच्या राजकारणातील मोठे नाव असलेले नितीन गडकरी यांच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. काही दिवसांपूर्वी याचा पहिला पोस्टर प्रदर्शित झाला होता. आता, याचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Gadkari Movie Teaser Out)
नितीन गडकरी यांनी भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी त्यांनी सर्वाधिक काळ काम केलं आहे. त्यामुळेच त्यांची ओळख “हायवे मॅन ॲाफ इंडिया” अशी बनली आहे. नितीन गडकरी या नावाला भारतात जितका सन्मान आहे, तितकेच हे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरही आदरणीय आहे. अशा व्यक्तिमत्वाला जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. तेव्हा नितीन गडकरी यांची भूमिका कोण साकारणार? याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. मात्र, ही उत्सुकता टीझरमध्येही कायम राहिली आहे.
हे देखील वाचा – “मराठीची अवस्था बिकट…”, ‘आत्मपॅम्फ्लेट’ पाहायला थिएटरमध्ये फक्त पाच प्रेक्षक, मनसेचे अमेय खोपकर यांचा संताप, म्हणाले, “प्रेक्षक मिळत नसतील तर…”
चित्रपटाच्या टीझरची सुरुवातच ही “या देशाची ओळख जेव्हा त्याच्या रस्त्याने होईल, तेव्हा मी आनंदाने म्हणू शकेन मी नितीन जयराम गडकरी…” या ओळीने झाली आहे. नितीन गडकरी त्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळेच एक प्रगतशील भारत नावारूपास आला. त्यामुळे त्यांची बांधिलकी ही केवळ राजकारणाशी नसून समाजकारणाशीही आहे, याचा प्रत्यय टीझरमधून येत आहे. या चित्रपटात नितीन गडकरींची भूमिका कोण साकारणार? हे समोर आले नाही. पण चित्रपटाचा टीझर पाहून प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
हे देखील वाचा – जालन्याच्या संकल्प काळेने पटकावलं ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २’चे विजेतेपद, ट्रॉफीसह मिळाले इतके लाख रुपये
अभिजीत मजुमदार प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती अक्षय देशमुख फिल्म्स बॅनरअंतर्गत अक्षय अनंत देशमुख यांनी केली आहे. तर चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे. चित्रपटात राहुल चोपडा, ऐश्वर्या डोरले, तृप्ती कालकर, अभिलाष भूसारी हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. नितीन गडकरींच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट येत्या २७ ऑक्टोबरपासून राज्यभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.