मोठ्या पडद्यावर अभिनेता अजय देवगणचा, अक्षय कुमार, दीपिका पदूकोन, रणवीर सिंह, करीना कपूर यांचा ‘सिंघम अगेन’ व कार्तिक आर्यन, विद्या बालन व माधुरी दीक्षित यांच्या मुख्य भूमिका असणारा ‘भूलभूलय्या ३’ हे चित्रपट धुमाकूळ घालताना दिसत आहेत. गेल्या तीन दिवसांत या दोन्ही चित्रपटांनी खूप कमाई केली आहे. मात्र तुम्हाला जर सिनेमागृहांमध्ये जाण्याचा वेळ नसेल तर असे काही धमाकेदार चित्रपट आहेत जे तुम्ही ओटीटीवर घरबसल्या पाहू शकता. हे चित्रपट नक्की कोणते आहेत? तसेच कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता? याबद्दल आपण आता जाणून घेऊया. (OTT special movies)
सिटाडेल : हनी बनी – वरुण धवन व समंथा रूथ प्रभू यांची मुख्य भूमिका असलेली सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ७ नोव्हेंबर २०२४ रोजी ॲमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये खूप सस्पेन्स असून यामध्ये केके मेनन, सिमरन व सिकंदर खेर हे कलाकारदेखील दिसणार आहेत.
द बंकिंगहम मर्डर्स – बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ही यामध्ये मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. या सीरिजचे दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केले असून यामध्ये रणवीर ब्रार, किथ एलन व ऐश टंडनदेखील दिसणार आहेत. ८ नोव्हेंबर २०२४ पासून नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.
विजय ६९ – अनुपम खेर यांची मुख्य भूमिका असणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनुपम यांची हटके भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट विनोदी असून भावनिकदेखील आहे. हा चित्रपट ८ नोव्हेंबर २०२४ पासून नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.
‘डेस्पिकेबल मी’ – हा या सीरिजचा चौथा भाग आहे. मिनीयन्स अशी गोड कॅरेक्टर यामध्ये दाखवण्यात आली आहेत. आजवर हा अनिमेटेड चित्रपट चाहत्यांची खूप पसंती मिळाली आहे. दरम्यान हे सगळे चित्रपट ओटीटीवर धुमाकूळ घालायला सज्ज आहेत. या सस्पेन्स, थ्रिलर, कॉमेडी असे अनेक पठडीतील चित्रपट पाहायला मिळणार आहेत.