Rupali Ganguly Husband Post : नुकतीच रुपाली गांगुलीबाबतची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ईशा वर्मा नावाच्या वापरकर्त्याने X वर एक नोट शेअर केली आहे, जी रुपालीचा पती अश्विन वर्माची पहिल्या पत्नी पासूनची मुलगी आहे. तिच्या पोस्टमध्ये ईशाने रुपालीची तुलना रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंग राजपूत यांच्याशी केली आहे. आणि तिच्यावर तिच्या वडिलांपासून विभक्त केल्याचा आरोप केला. यानंतर आता, अश्विनने व्हायरल दाव्यांना उत्तर देणारी एक नोट पोस्ट केली आहे. रुपालीबाबत केलेल्या आरोपांवर तिच्या नवऱ्यानं स्पष्टीकरण देत बाजू मांडली आहे.
रुपाली गांगुलीच्या पतीने लिहिले आहे की, “मला हे कळतंय की, माझी धाकटी मुलगी अजूनही खूप दुःखी आहे. तिच्या पालकांचे नाते तुटल्यामुळे तिला खूप वाईट वाटत आहे. कारण घटस्फोट हा एक कठीण अनुभव आहे जो त्या लग्नानंतर मुलांना खूप प्रभावित करतो आणि हानी पोहोचवू शकतो”. अश्विन के. वर्मा म्हणाले, “पण लग्न अनेक कारणांमुळे संपते आणि माझ्या पहिल्या पत्नीबरोबरच्या नातेसंबंधात अनेक आव्हाने आली ज्यामुळे आम्ही वेगळे झालो. ती आव्हाने जी तिच्या आणि माझ्यामध्ये होती आणि ज्याचा इतर कोणाशीही संबंध नव्हता. मला फक्त माझ्या मुलांसाठी आणि माझ्या पत्नीसाठी सर्वोत्तम काय हवे आहे याकडे लक्ष द्यायचे आहे”. मीडियाद्वारे कोणालाही नकारात्मकतेत ओढले जात असल्याचे पाहून त्यांना त्रास होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा – “मारण्याची धमकी, तिचे अफेअर अन्…”, सावत्र लेकीचे रुपाली गांगुलीवर गंभीर आरोप, म्हणाली, “हिची खरी कहाणी आणि…”
रुपालीच्या सावत्र मुलीने पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, “हे अत्यंत दयनीय आहे. रुपाली गांगुलीची खरी कहाणी कुणाला माहित आहे का? अश्विन के वर्माचे दुसरे लग्न झालेले असताना तिचे बारा वर्षे प्रेमसंबंध होते. अश्विन यांना त्याच्या आधीच्या लग्नापासून दोन मुली आहेत. ती एक क्रूर मनाची स्त्री आहे, जिने मला आणि माझ्या बहिणीला माझ्या वडिलांपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करण्याशिवाय काहीही केले नाही. मुंबईत येण्यापूर्वी वडील १३-१४ वर्षे कॅलिफोर्निया आणि नंतर न्यू जर्सी येथे राहिले”.
पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, “जेव्हा मी माझ्या वडिलांना फोन करण्याचा प्रयत्न करते तेव्हा रुपाली मला आणि माझ्या आईला मारण्याची धमकी देऊ लागते. हे बरोबर नाही, तिने माझ्या वडिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. तिने तिला हवे ते मिळवण्यासाठी इतरांचा नाश केला”.