बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडकेच्या लग्नात ‘बिग बॉस १७’मधील जोडप्याचीच हवा, पारंपरिक कपडे परिधान करत लग्नामध्ये एन्ट्री

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 26, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Neil Bhatt and Aishwarya Sharma attended the wedding of Siddharth Bodke and Titeeksha Tawde

तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडकेच्या लग्नात ‘बिग बॉस १७’मधील जोडप्याचीच हवा, पारंपरिक कपडे परिधान करत लग्नामध्ये एन्ट्री

लग्न म्हटलं की मित्रपरिवारांचा गोतावळा हा आलाच आणि या मित्रपरिवारासह धम्माल मज्जा मस्तीही आली. त्यात खास मित्राचे लग्न असेल तर कोणताही जिवलग आपल्या मित्राच्या लग्नात हमखास हजेरी लावणार. नुकताच  अभिनेता सिद्धार्थ बोडके हा अभिनेत्री तितीक्षा तावडेबरोबर विवाहबंधनात अडकला आहे. अगदी दिमाखात दोघांचा विवाहसोहळा पार पडला असून त्यांच्या लग्नात मराठीसह हिंदी कलाकारांनीदेखील हजेरी लावली असल्याचे पाहायला मिळाले.

हिंदी टेलिव्हिजनची प्रसिद्ध जोडी नील भट व ऐश्वर्या शर्मा या दोघांनी सिद्धार्थच्या लग्नात खास हजेरी लावली होती. अभिनेता सिद्धार्थ बोडकेने मराठीसह हिंदी मनोरंजन सृष्टीतही अभियाने केला आहे. त्यामुळे मराठीसह हिंदी सिनेविश्वातदेखील त्याचा मित्रपरिवार आहे. सिद्धार्थने ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेत काम केले होते आणि याच मालिकेत नील व ऐश्वर्या शर्मा यांनीही काम केले होते. त्यामुळे सिद्धार्थच्या लग्नात नील व ऐश्वर्या यांनी खास हजेरी लावली असल्याचे पाहायला मिळाले.

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Sharma (@aisharma812)

नील भट व ऐश्वर्या शर्माने सिद्धार्थ-तितीक्षाच्या लग्नात खास मराठमोळा लूक केला असल्याचे पाहायला मिळत आहे. ऐश्वर्याने लग्नासाठी खास हिरव्या रंगाची सुंदर नक्षीकाम असलेली साडी परिधान केली होती. तसेच त्यावर डिझाईनर ब्लाऊजदेखील परिधान केला आहे. तर नीलनेही ऐश्वर्याच्या लूकला साजेसा हिरव्या रंगाचा कुर्ता, त्यावर डिझाईनर जॅकेट अन् सफेद रंगाचा पायजमा परिधान केला आहे.

आणखी वाचा – Video : हळद लागताच नवऱ्याबरोबर बेभान होऊन नाचली तितीक्षा तावडे, मंडपामध्ये जबरदस्त दंगा अन्…; उपस्थितही बघून चक्रावले, व्हिडीओ व्हायरल

ऐश्वर्या व नीलने त्यांच्या सोशल मीडियावर सिद्धार्थ-तितीक्षा यांच्या लग्नातील खास फोटो शेअर करत त्यांना त्यांच्या लग्नानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. ऐश्वर्या व नीलने तितीक्षा-सिद्धार्थबरोबरचे फोटो शेअर करत त्याखाली “एक स्वप्न आज पूर्ण झाले, नाते प्रेमाचे विवाहबद्ध झाले” असं म्हणत त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांना अभिनंदनही म्हटलं आहे.

आणखी वाचा – Video : असाही लग्नसोहळा! नवऱ्याने वरमाला घालताच भर मंडपात रडू लागली तितीक्षा तावडे, उपस्थितही बघत बसले अन्…

दरम्यान, नील व ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्यांच्या अनेक चाहत्यांनी नील व ऐश्वर्याच्या लूकचे कौतुक केले आहे त्याकहब्रॉबर सिद्धार्थ व तितीक्षा यांना लग्नानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत.         

Tags: Aishwarya Sharmaentertainment newsmarathi actormarathi actressmarathi entertainment newsMarathi newsNeil Bhattsiddharth bodkeSiddharth Bodke Titeeksha Tawde Marriagetiteeksha tawdeऐश्वर्या शर्मातितीक्षा तावडेनील भट्टमनोरंजन बातमीमराठी अभिनेतामराठी अभिनेत्रीमराठी बातमीमराठी मनोरंजन बातमीसिद्धार्थ बोडकेसिद्धार्थ बोडके तितीक्षा तावडे लग्न
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Chahat Khanna Personal life
Entertainment

आजारी असतानाही शरीरसंबंध ठेवायचा आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जून 4, 2025 | 6:00 pm
Nivedita saraf talk about ashok saraf
Entertainment

“इतरांप्रमाणे दुसऱ्यांचे डायलॉग न कापता…”, पत्नी निवेदितांकडून अशोक सराफांचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “दुसऱ्याला बरोबर घेऊन…”

जून 4, 2025 | 5:48 pm
Dipika Kakar Health
Entertainment

दीपिका कक्करची कॅन्सरवर मात, १४ तास सुरु होती शस्त्रक्रिया, नवऱ्याने दिली अपडेट, म्हणाला, “आता आयसीयूमध्ये…”

जून 4, 2025 | 4:24 pm
Jaya bachchan angry on paparazzi
Entertainment

Video : “निघा इथून, सगळेच घाणेरडे”, फोटोग्राफर्सवर अचानकच भडकल्या जया बच्चन, गाडीमध्ये बसूनही ओरडत राहिल्या अन्…

जून 4, 2025 | 3:29 pm
Next Post
Music Legend Pankaj Udhas Death News in Marathi

Pankaj Udhas Death : "संगीतक्षेत्राचं मोठं नुकसान", गझल गायक पंकज उधास यांच्या निधनानंतर राजकीय मंडळीही हळहळले, पंतप्रधान मोदी म्हणाले, "त्यांच्याशी साधलेला संवाद…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.