छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तितीक्षा तावडे नुकतीच अभिनेता सिद्धार्थ बोडकेबरोबर विवाहबंधनात अडकली आहे. नुकत्याच झालेल्या ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त तितीक्षा व सिद्धार्थ यांबई त्यांचा एक खास फोटो शेअर करत त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली. तेव्हापासून् त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती आणि अखेर हे दोघे नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत.
लग्नासाठी तितीक्षा व सिद्धार्थने खास लूक केला असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी तितीक्षाने ऑफ व्हाईट रंगाची नऊवारी साडी नेसली होती तर या साडीला साजेसा असा पिवळ्या रंगाचा डिझाइनर ब्लाऊजही परिधान केला आहे. तर सिद्धार्थने तितीक्षाच्या लूकला साजेसा असा ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी व त्यावर धोतर परिधान केला होता. त्यांचा हा खास लूक चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडत आहे.
तितीक्षा व सिद्धार्थ ही जोडी नुकतीच विवाहबंधनात अकडली असून त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत. लग्नाच्या अनेक फोटो व व्हिडीओमध्ये आता दोघांच्या हळदी समारंभाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तितीक्षा व सिद्धार्थने त्यांच्या हळदी समारंभाला भन्नाट डान्स केला होता आणि त्यांचा हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आणखी वाचा – Video : असाही लग्नसोहळा! नवऱ्याने वरमाला घालताच भर मंडपात रडू लागली तितीक्षा तावडे, उपस्थितही बघत बसले अन्…
या व्हिडीओमध्ये सिद्धार्थने चंगळच ठेका धरला असल्याचे पाहायला मिळत असून सिद्धार्थच्या बरोबरीने तितीक्षानेदेखील त्याला उत्तम साथ दिली आहे. तितीक्षाही सिद्धार्थबरोबर अगदी बेभान होऊन नाचत आहेत. दरम्यान, या व्हिडीओमध्ये दोघेही एकमेकांबरोबर अतिशय आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलीच पसंती दर्शवली आहे. सिद्धार्थ-तितीक्षाच्या अनेक चाहत्यांनी दोघांच्या भन्नाट डान्सचे कौतुकही केले आहे. तसेच त्यांना त्यांच्या लग्नानिमित्त शुभेच्छादेखील दिल्या आहेत. दोघांच्या या भन्नाट डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.