लोकप्रिय मालिकांच्या यादीत सध्या आवर्जून घेतलं जाणार नाव म्हणजे झी मराठी वाहिनीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका. मालिकेच्या सुरुवातीपासूनच या मालिकेला चाहत्यांची पसंती मिळाली. या मालिकेतील राघव आणि आनंदीच्या जोडीला प्रेक्षकांनी उचलून धरलं. मालिकेत आलेल्या वळणांमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडतेय. राघव आणि आनंदीच्या नात्यात दुरावा आला आहे. राघव आणि आनंदी आता पुन्हा एकत्र कधी येणार याकडे आता साऱ्या प्रेक्षकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.(Nava Gadi Nav Rajya Promo)
पहा नवा गडी नवं राज्य मालिकेत काय घडणार (Nava Gadi Nav Rajya Promo)
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये असे पाहायला मिळत आहे की, आनंदी आणि राघव यांच्यात दुरावा आल्याचं आनंदीच्या भाच्याला समजत, राघव आनंदीला मिस करतोय हे त्याला कळत, त्यावेळी तो सोसायटी मधल्या लहान मुलांना एकत्र करून आनंदी घरी यावी म्हणून उपोषण करतो. अनादी घरी आल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असे ती मुलं सांगतात. त्यावेळी राघव आनंदीला समजावण्याचा प्रयत्न करताना दिसतो.
राघव आनंदीला बोलतो की, माझ्यासाठी नाही पण मुलांसाठी तरी तू घरी ये. आता राघवच्या बोलण्याचा आणि मुलांच्या उपोषणाचा विचार करून आनंदी घरी येणार का हे पाहणं रंजक ठरेल. राघव आणि आनंदी यांच्यातील दुरावा मिटेल का याकडे साऱ्यांचा नजरा लागून राहिल्या आहेत.(Nava Gadi Nav Rajya Promo)
हे देखील वाचा – अक्षयाच्या आई-वडिलांचा धम्माल डान्स
‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेत अभिनेता कश्यप परुळेकर आणि अभिनेत्री पल्लवी पाटील मुख्य भूमिकेत दिसत आहेत.