शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्यांचा शेवटचा कॉल मी उचलला नाही आणि…”, ऋषी कपूर यांच्या निधनापूर्वी घडलेल्या ‘त्या’ घटनेबाबत लेकीचा खुलासा, म्हणाली, “रुग्णालयामध्ये…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 26, 2024 | 4:21 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Riddhima Kapoor expressed her regret that she could not pick Rishi Kapoor's last call

"त्यांचा शेवटचा कॉल मी उचलला नाही आणि...", ऋषी कपूर यांच्या निधनापूर्वी घडलेल्या 'त्या' घटनेबाबत लेकीचा खुलासा, म्हणाली, "रुग्णालयामध्ये..."

दिवंगत बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर हे आज हयात नसले तरी त्यांच्याविषयीच्या कोणत्याही गोष्टीने प्रत्येकांना त्यांची आठवण येतेच. ते आता आपल्यात नसले तरी अनेकांच्या हृदयात आजही त्याचे विशेष स्थान आहे. ऋषी कपूर यांचे कर्करोगाने निधन झाले असल्याचे आपण जाणतोच. तसेच त्यांच्या शेवटच्या दिवसांबद्दल आणि उपचारांबद्दल बरेच वाचले गेले असले तरी, आता त्यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनी आणि जावई भरत साहनी यांनी एका मुलाखतीत त्यांच्या कठीण काळाबद्दल सांगितले आहे.

गलाता प्लसशी संवाद साधताना, रिद्धिमाने तिच्या वडिलांविषयीची भावनिक गोष्ट व्यक्त केली आहे. रिद्धिमा साहनी आपल्या ऋषी कपूर यांच्याविषयी व्यक्त झाली. जेव्हा तिचे वडील वारले तेव्हा ती दिल्लीत होती आणि त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्याबरोबर नव्हती. तसेच लॉकडाऊनमुळे त्यांना प्रवासासाठीही विशेष परवानगी घ्यावी लागली. मात्र तरीही ती त्यांच्या अंत्यसंस्कारानंतरच आली. यावेळी तिने आपल्याला प्रत्यक्ष न भेटता आल्यामुळे व्हिडीओ कॉलद्वारे त्यांना बघितल्याची आठवणही व्यक्त केली.

View this post on Instagram

A post shared by Riddhima Kapoor Sahni (RKS) (@riddhimakapoorsahniofficial)

आणखी वाचा – किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज, कधी व कुठे पाहता येणार? जाणून घ्या…

ही आठवण सांगताना तिने असं म्हटलं की, “वडिलांनी मला त्यांच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी फोन केला होता. पण मी त्यांचा फोन उचलू शकली नाही. पप्पांनी मला कॉल केला होता, तो अजूनही माझ्या फोनमध्ये आहे. तो त्यांचा शेवटचा कॉल होता. कदाचित मी तेव्हा तो कॉल उचलला असता तर बरं झालं असतं असं मला आजही वाटतं. त्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे त्यांच्याशी संवाद साधता आला नाही किंवा त्यांच्याशी बोलताही आले नाही. त्यांचा तो मिस कॉल मी अजूनही माझ्याकडे जपून ठेवला आहे. मी त्यांच्या मिस कॉलचा स्क्रीनशॉट घेतला आणि सेव्ह केला. कारण त्यांनी मला कॉल केलेली ही शेवटची एक आठवण होती.”

आणखी वाचा – दुसऱ्याच्या शरीराचा ताबा घेण्याची विरोचकाकडे शक्ती, केतकीला स्वत:च्या बाजूने करुन घेतल्यानंतर इतरांच्या जीवाला धोका

दरम्यान, ऋषी कपूर यांना त्यांच्या शेवटच्या दिवसांत कॅमेऱ्यासमोर उभे राहून चित्रपटांत काम करण्याची इच्छा असल्याचे त्यांच्या जावयाने सांगितलं. ऋषी कपूर यांचे निधन 30 एप्रिल रोजी झाले. त्यावेळी कोरोनामुळे लॉकडाऊन झाला होता. रिद्धिमा तिच्या वडिलांच्या अंत्यविधीला पोहोचू शकत नव्हती. आलिया भट्टनं तिला व्हिडीओ कॉलवर ऋषी कपूर यांचे शेवटचे दर्शन दिले. 

Tags: Bollywood entertainment newsRiddhima Kapoorrishi kapoor
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
arti singh wedding

Video : लग्नानंतर स्वतः गाडी चालवत सासरी गेली आरती सिंह, भाऊ म्हणाला, "आमची मुलगी मुलगा घेऊन पळाली आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.