अभिनेत्री, अभिनेते, बालकाकार यांच्या डान्सचे अनेक धम्माल व्हिडिओ प्रेक्षकांना पाहायला नेहमी मिळतात. पण कधी कधी यांच्या व्यतिरिक्त ही काही असे व्हिडिओ कलाकार शेअर करत असतात जे पाहून आणखी जास्त आनंद त्यांच्या चाहत्यांना होतो. असाच एक व्हिडिओ शेअर केलाय सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील अभिनेत्री अक्षया नाईक ने. आज अक्षयाच्या आई वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस त्या निम्मित अक्षया ने त्यांचे काही मजेशीर व्हिडिओ आणि फोटोज शेअर केले आहेत. त्यामध्ये अक्षयाच्या आई वडिलांचा एक धम्माल डान्स सध्या चांगलाच वायरल होतोय.(Akshya Naik Family)
अक्षया च्या या पोस्ट वर अनेक चाहत्यांनी आई वडिलांना शुभेच्छा दिल्या आहेत तर त्यांच्या डान्सच कौतुक देखील केलं आहे. अक्षया सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील सुंदर मनामध्ये भरली या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सध्या या मालिकेत लतिका आणि देवाच्या प्रेमाचा ट्रॅक सुरु आहे. आणि या दोघांची जोडी ही प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहे.(Akshya Naik Family)