वयाची पन्नाशी उलटून गेली तरी अतिशय निरागस, मनमोहक, लाघवी दिसणाऱ्या अभिनेत्रींमध्ये एका अभिनेत्रीच नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे ऐश्वर्या नारकर.(Aishwarya Narkar Photoshoot)
ऐश्वर्या नारकर नेहमीच तिच्या फोटोशूटने चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरते. वेगवेगळ्या फोटोशूटमुळे ऐश्वर्या नेहमीच चर्चेत असते.
साध्या लूकमध्येही तिच्या सौंदर्याची निखळता नेहमीच प्रेक्षकांना भुरळ घालत असते.(Aishwarya Narkar Photoshoot)
अशातच ऐश्वर्याच्या नव्या फोटोशूटने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. Life is not about finding yourself .Life is about creating yourself.असं कॅप्शन देत तिने नव्या फोटोशूटचे फोटो पोस्ट केले आहेत.
बॅकलेस असलेले काही पारंपारिक साडीवरील खास फोटो शेअर करून ऐश्वर्या यांच्या फोटोने चाहत्यांना पुन्हा एकदा घायाळ केले आहे. (Aishwarya Narkar Photoshoot)
हे देखील वाचा – आनंदी परत येणार का राघवच्या घरी?
अर्थात ऐश्वर्या यांच्या फोटोंसोबत त्यांच्या फोटोंवरील कमेंट ही अधिक लक्षवेधी असतात. या फोटोंवरील एका कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.
अशातच ऐश्वर्या यांच्या एका चाहत्याने कमेंट करत “चाळीशीनंतर स्त्री बर्फीचा तुकडा दिसते तुकडा” असं म्हटलंय. (Aishwarya Narkar Photoshoot)
वयाची पन्नाशी ओलांडली तरी ऐश्वर्या यांच्या सौंदर्यात तसूभरही फरक पडला नसून उलट त्यांचं सौंदर्य अधिक खुललेलं नेहमीच पाहायला मिळतंय.