शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज, कधी व कुठे पाहता येणार? जाणून घ्या…

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 26, 2024 | 3:11 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Laapataa Ladies Kiran Rao Directed movie will be released on Netflix

किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज, कधी व कुठे पाहता येणार? जाणून घ्या...

किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ या चित्रपटाला प्रेक्षकांसह समीक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला. १ मार्च रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी कमाई केली होती. ‘लापता लेडीज’ चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शिका किरण रावने रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले.  अशातच आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. जाणून घ्या, ‘लापता लेडीज’ हा चित्रपट कोणत्या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होणार आहे.

नेटफ्लिक्स या ओटीटी माध्यमावर हा चित्रपट प्रदर्शित होणार असून नुकतंच याचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘लापता लेडीज’ चित्रपट आता ओटीटीवर शुक्रवारपासून रिलीज होणार असल्याचे ‘नेटफ्लिक्स’ने जाहीर केले आहे. २६ एप्रिल म्हणजेच आजपासून हा चित्रपट ऑनलाइन प्रदर्शित होणार असल्याचे नेटफ्लिक्सने सांगितले. त्यामुळे ज्यांना हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पाहता आला नाही आणि ज्यांना पुन्हा पाहायचा आहे, अशा दोन्ही प्रेक्षकांना ‘लापता लेडीज’ ओटीटीवर पाहता येणार आहे. 

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

आणखी वाचा – दुसऱ्याच्या शरीराचा ताबा घेण्याची विरोचकाकडे शक्ती, केतकीला स्वत:च्या बाजूने करुन घेतल्यानंतर इतरांच्या जीवाला धोका

‘लापता लेडीज’ ही दोन महिलांची गोष्ट आहे. नवीनच लग्न झालेला दीपक आपल्या बायकोला घेऊन त्याच्या गावी जातो. पण घरात नवरीचा पदर उचलला की, सगळ्यांचेच डोळे उघडे राहतात. फूल कुमारीशी लग्न करायला गेलेला दीपक पुष्पाला घरी घेऊन येतो. फुल कुमारी कुठे आहे आणि पुष्पा कोण आहे याचे रहस्य चित्रपटाच्या अखेरीस उलगडते. अशी या चित्रपटाची कथा असून या चित्रपटाद्वारे सामाजिक संदेशही देण्यात आला आहे.

आणखी वाचा – तितीक्षा-सिद्धार्थच्या लग्नाला २ महीने पूर्ण होताच बहीणीने दिल्या हटके शुभेच्छा, खुशबूने व्हिडीओ शेअर करत म्हटलं, “मी नेहमीच…”

या चित्रपटाची निर्मिती आमीर खानसह किरण राव आणि ज्योती देशपांडे यांनी केली आहे. चित्रपटात नितांशी गोयल, प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. छाया कदम यांनीदेखील या चित्रपटात आपली छाप सोडली आहे. तसेच रवी किशनही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. जवळपास ५० दिवस हा चित्रपट मोठ्या पडद्यावर सुरू होता. यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवरही पाहण्यासाठी सज्ज झाला आहे. 

Tags: bollywood moviesLaapataa Ladiesott entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Appi amachi collector sairaj kendre entry

'आमच्या पप्पांनी गणपती आणला' फेम साईराजची मराठी मालिकेमध्ये एन्ट्री, सात वर्षांचा लीप आल्यानंतर कथेमध्ये ट्विस्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.