रंगभूमीवर लागू होणार ‘नियम व अटी’! संकर्षण कऱ्हाडे लिखित नवीन नाटकाची घोषणा

sankarshan karhade new drama
sankarshan karhade new drama

मराठी माणसाच्या आवडी निवडीत एक आवड अशी आहे जी प्रत्येक मराठी माणसाच्या कुठे ना कुठे भाग बनते ती गोष्ट म्हणजे ‘नाटक’. मराठी रंगभूमीवर असाधारन असे एकापेक्षा एक नाटकाचे विषय मराठी कलाकारांनी आणले आहेत. मराठी रंगभूमी बहारदार करणाऱ्या कलाकारांच्या यादीत अनेक मान्यवरांची नावे घेतली जातात.(sankarshan karhade new drama)

हरवत चाललेला प्रेक्षक वर्ग पुन्हा एकदा रंगभूमीकडे परतत असल्याचा आनंद सर्व रंगभूमीकर्मियाना झाला आहे. नुकताच १२५०० प्रयोगांचा टप्पा गाठणारे नाट्यसम्राट प्रशांत दामले यांसारख्या अनेक मंडळींनी मराठी रंगभूमी सुदृढ बनवली.

सध्याच्या परिस्थतीत असाच अजून एक रंगभूमीवेडा कलाकार आहे तो म्हणजे अभिनेता संकर्षण कऱ्हाडे. मालिका, चित्रपट, नाटक अशा तिन्ही आघाड्यांवर आघाडीवर असणारा संकर्षण आता अजून एक नवीन नाटक घेऊन प्रेक्षकांच्या आहे. कुठलीही गोष्ट खरेदी करताना त्यावर टॅक्स प्रमाणेच लागू असतात नियम आणि अटी याच नियम आणि अटींवर ‘नियम व अटी लागू’ हे नव कोरं नाटक लिहिण्याची किमया संकर्षण ने केली आहे.

नक्की काय आहे नवीन नाटकाचा विषय(sankarshan karhade new drama)

संकर्षण ने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून या संदर्भात पोस्ट करत माहिती दिली आहे. दिगदर्शक चंद्रकांत कुलकर्णी या नाटकाचे दिगदर्शक असून लेखन स्वतः संकर्षण ने या नाटकाचे लेखन केले आहे. संकर्षण ने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून या संदर्भात पोस्ट करत माहिती दिली आहे.इंस्टाग्राम वर पोस्ट केलेल्या व्हिडीओच्या कॅप्शन मध्ये संकर्षण ने ‘येssssss नवं कोरं करकरीत भन्नाट नाटक! येतंय लवकरच… 🤗🙏🏻❤️ अजून माहिती सांगू? नाही सांगू शकत. कारण नियम व अटी लागू!’ असं लिहिलं आहे तर अजून माहिती साठी नाटकाचंच इंस्टाग्राम आलं आहे.(sankarshan karhade new drama)

प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतून समीर या संकर्षण ने साकारलेल्या पात्राला चाहत्यांनी चांगलंच प्रेम दिलं. सोबतच संकर्षणच्या ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाचे ही प्रयोग अगदी दणक्यात सुरु आहेत. रंगभूमीवर लागू होणाऱ्या ‘ नियम व अटींना’ प्रेक्षक कशी दाद देतील हे पाहणं रंजक ठरणार आहे.

====

हे देखील वाचा – रात्रीस खेळ चाले नंतर पुन्हा एकदा उडणार झोप!’चंद्रविलास’ वैभव मांगले दिसणार भयावह रूपात….

====

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Sankarshan Karhade fan moment
Read More

‘खाउ साठी हे ५०० रूपये घे..’ प्रयोग पाहून सुखावलेल्या प्रेक्षकाची संकर्षणला अनोखी भेट

रुपेरी पडदा असो व रंगमंच संकर्षणच्या अभिनयाचं पारडं नेहमी जड असतं. अभिनयासोबतच एखाद्या विषयावर तेवढच परखड मत असणं…
Sankarshan Karhade post viral
Read More

3 Idiots मधील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाच्या प्रयोगाला हजेरी

सिनेसृष्टीत असे काही कलाकार आहे की ते फक्त अभिनेते म्हणून नव्हे तर अनेक कलागुणांनी ओळखले जातात. सध्याच्या पिढीतील…
Prashant damle
Read More

अभिमानस्पद! नाटककार प्रशांत दामले यांचा ‘या’ मानाच्या पुरस्काराने गौरव

नाटक म्हणजे जिवंत, मृत, पौराणिक, ऐतिहासिक किंवा काल्पनिक व्यक्ती अथवा प्राणी यांच्या भूमिका करणाऱ्या नटांनी रंगमंचावर सादर केलेली…
bhau kadam onkar bhojane
Read More

“दोन विनोदवीरांची मालवणीत जुगलबंदी” महेश मांजरेकर करणार निर्मिती

छोट्या पडद्यावर तूफान लोकप्रिय झालेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या रिऍलिटी शो मधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला विनोदी अभिनेता म्हणजे ओंकार…
sangeet devbabhali
Read More

पंढरीच्या विठुराया चरणी तल्लीन होणार ‘देवबाभळी दिंडी–धावा जनामनाचा…

हल्ली मराठी रंगभूमीकडे प्रेक्षक पुन्हा फिरताना दिसतोय. रंगभूमीवर रंगणाऱ्या नाटकांना प्रेक्षक पून्हा एकदा भरभरून प्रेम देताना दिसत आहेतच.…