शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे राहुल द्रविड यांची पुतणी, सामन्यानंतर घेतली भेट, फोटो व्हायरल

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 21, 2023 | 1:26 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Aditi Dravid viral Photo

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे राहुल द्रविड यांची पुतणी, सामन्यानंतर घेतली भेट, फोटो व्हायरल

मराठी मालिका व चित्रपटांमधून रसिकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे अदिती द्रविड. अदितीने रंगभूमीतून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकांमध्ये झळकली आहे. ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटात महत्वाची भूमिकादेखील तिने केली असून तिच्या प्रत्येक भूमिकेला रसिक प्रेक्षकांचं प्रेम मिळालं आहे. अदिती उत्तम अभिनेत्री तर आहेच, त्याचबरोबर ती उत्तम नृत्यांगणा व गीतकार सुद्धा आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेली अदिती तिच्या चाहत्यांसह नेहमी विविध फोटोज व व्हिडीओज शेअर करत असते. अशात तिने एक फोटो नुकतंच शेअर केला, ज्याची सध्या चर्चा होत आहे. (Aditi Dravid viral Photo)

भारतात सध्या क्रिकेट वर्ल्डकप सुरु असून वर्ल्डकपमधील भारत विरुद्ध बांगलादेश सामना पुणे येथे नुकतंच पार पडला होता. या सामन्यानंतर अदितीने माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती राहुल द्रविड यांच्याबरोबर दिसत असून या फोटोला तिने ‘द्रविड्स’ असं कॅप्शन दिलं आहे.

हे देखील वाचा – Video : नवरा लेकींचा अभ्यास घेत आहे पाहून क्रांती रेडकर भारावली, नेटकऱ्यांकडूनही कौतुक, म्हणाली, “जेव्हा तो तुम्हाला मदत करतो तेव्हा…”

View this post on Instagram

A post shared by Aditi Vinayak Dravid (@aditi_vinayak_dravid)

दरम्यान, तिचा हा फोटो सध्या व्हायरल होत असून चाहत्यांसह नेटकऱ्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर सलील कुलकर्णी, समीर परांजपे, निखिल राऊत यांसारख्या अनेक कलाकार मंडळींनीही पोस्टवर कमेंट करत अदितीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री अदिती द्रविड व राहुल द्रविड यांचं फार विशेष नातं आहे. अदिती ही राहुल द्रविड यांची चुलत पुतणी आहे. त्याचा खुलासा स्वतःच एक पोस्ट शेअर करत त्यावेळी केला होता.

हे देखील वाचा – WORLD CUP 2023 PAK VS AUS : पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात शतक झळकावल्यानंतर डेव्हिड वॉर्नर बनला ‘पुष्पा’, काही मिनिटांतच व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Aditi Vinayak Dravid (@aditi_vinayak_dravid)

अदितीने ‘बाईपण भारी देवा’ या सुपरहिट चित्रपटातील ‘मंगळागौर’ गाणं लिहिलं आहे, जे प्रचंड गाजलं होतं. ‘गोष्ट एका पैठणी’ नंतर अभिनेत्रीकडे अनेक चित्रपटांची रंग लागलेली आहे. त्यापैकी प्रसाद ओकबरोबरचा ‘मीरा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या ती ‘फुलवंती’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर अदिती लवकरच मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाली आहे.

Tags: Aditi DravidAditi Dravid viral Photomarathi actressrahul dravid
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
tejaswini pandit personal life

कर्जबाजारी झालो, घरात जेवण-लाईट नाही अन्...; तेजस्विनी पंडितला सत्य परिस्थिती सांगताना कोसळलं होतं रडू, म्हणालेली, “लोकांच्या नजरा...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.