फँड्री, सैराट सारखे अनेक सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे लवकरच ‘नाळ’चा दुसरा भाग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. त्याचबरोबर, चित्रपटाने अनेक राष्ट्रीय पुरस्कारांवरही आपले नाव कोरले आहे. चित्रपटाची कथा व छायचित्रणाचे कौतुक झाले. शिवाय, चिमुकल्या ‘चैत्या’चे बोबडे बोल आणि ‘जाऊ दे न व’ गाण्याने प्रेक्षकांवर वेगळीच जादू केली होती. अशातच, या बहुप्रतीक्षित चित्रपटाचं पहिलं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. (Naal 2 Movie First Song out)
‘नाळ भाग दोन’ मधील पहिलं गाणं ‘भिंगोरी’ नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. मास्टर अवन, कडुबाई खरात, मनीष राजगिरे आणि नागेश मोरवेकर यांचा सुमधुर आवाज या गाण्याला लाभला आहे. या गाण्याला वैभव देशमुख यांनी शब्दबद्ध, तर ए.व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिलं आहे. गाण्याची सुरुवात डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या गावाचं सुंदर निसर्गाने होते. गावात ‘चैत्या’चं येणं बघून आनंदी झालेले गावकरी, गावकऱ्यांची व त्यानंतर त्याच्या खऱ्या आईची होत असलेली भेट हे या गाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे.
हे देखील वाचा – Video : “अररा बाप…”, भारताने बांगलादेशविरुद्ध दणदणीत विजय मिळवल्यानंतर गौरव मोरेचा एकच जल्लोष, व्हिडिओ व्हायरल
त्याचबरोबर, या गाण्यात मोठा ‘चैत्या’ आणि त्याच्या खऱ्या आईची झलक पाहायला मिळत आहे. एकूणच हे गाणं प्रेक्षकांना भावलं आहे. तसेच, सोशल मीडियावरदेखील हे गाणं ट्रेंडिंगमध्ये आलं आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाप्रमाणे याही भागात आपल्याला श्रीनिवास पोकळे, देविका दफ्तरदार, नागराज मंजुळे हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसतील. त्याचबरोबर अभिनेत्री दीप्ती देवीसुद्धा यामध्ये असणार आहे. चैत्या त्याच्या खऱ्या आईला पाहिल्यानंतर पुढे काय घडतं, याची सर्वांनाच मोठी उत्सुकता लागली आहे.
हे देखील वाचा – “बसा तरी म्हणायचं होतं”, ‘त्या’ व्हिडीओवरून अशोक मामांना बोलणाऱ्यांवर भडकले भाऊ कदम, म्हणाले, “एकदा विचारा तरी…”
नागराज मंजुळे व झी स्टुडिओज या चित्रपटाची निर्मिती करत आहे. तर, सुधाकर रेड्डी यक्कंटी यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. येत्या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी ही दिवाळी अधिकच संस्मरणीय असणार, हे मात्र नक्की.