सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी कार्यक्रम दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या पसंतीचा उच्चांक गाठत आहे. या कार्यक्रमातील सर्वच विनोदवीर केवळ महाराष्ट्रात नाही, तर देश-विदेशातील रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचले आहे. तसेच, या विनोदवीरांना त्यांच्या चाहत्यांकडून खूप प्रेम मिळत असतं. याच कार्यक्रमातील एका अवलियाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे, तो म्हणजे अभिनेता गौरव मोरे. गेल्या अनेक वर्षांपासून गौरव या कार्यक्रमाचा भाग आहे. त्याच्या अचूक विनोदी टायमिंग आणि पंचेसचे केवळ सर्वसामान्य नाही. तर अनेक नामवंत व्यक्तीसुद्धा दिवाने आहेत. त्यामुळे तो जेव्हा जिथे जातो, तिथे त्याच्या डायलॉग व स्टेपची नेहमी चर्चा होत असते. याची प्रचिती नुकतीच दिसून आली. (Gaurav More celebration after India winning Cricket Match)
सध्या देशात क्रिकेट वर्ल्डकपचे सामने सुरु असल्याने ठिकठिकाणी क्रिकेटची क्रेझ आपल्याला पाहायला मिळत आहे. पुण्यात काल भारत विरुद्ध बांग्लादेश सामना रंगला होता. ज्यात भारताने बांगलादेशवर ७ गडी राखून विजय मिळवला होता. विशेष म्हणजे, गौरवसह ‘बॉईज ४’च्या संपूर्ण कलाकारांनी पुण्यात रंगलेल्या या सामन्याचा आनंद लुटला. सामना संपल्यानंतर गौरवने एका खास चाहत्यासह त्याचा स्टाईलने हा विजय साजरा केला. हा आनंद साजरा करतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
हे देखील वाचा – Video : सई ताम्हणकरने तारपा नृत्यावर धरला ठेका, अदिवासी मुलींबरोबर थिरकली, सोशल मीडियावर होत आहे कौतुक
पुण्यातील सामना संपल्यानंतर गौरवने प्रसिद्ध क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांच्यासह ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील त्याची आयकॉनिक स्टेप करत हा विजय साजरा केला. गौरवचा हा व्हिडीओ ‘बॉईज ४’च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. ज्याला “भारताने बांग्लादेशला हरवल्याचा आनंद साजरा करताना सुनंदन लेले आणि गौरव मोरे!”, असं हटके कॅप्शन दिलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसत असून कमेंटद्वारे त्यांनी गौरववर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “सुनंदन लेले सर आणि गौरव भाई राॅक्स” अशी कमेंट एका नेटकऱ्याने या व्हिडिओवर केली आहे.
हे देखील वाचा – “अनेक धर्मग्रंथांनी आपल्याला…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची फेसबुक पोस्ट चर्चेत, म्हणाला, “वर्गीकरणाचा खेळ…”
गौरवच्या कामाबद्दल बोलायला गेल्यास, त्याचा ‘बॉईज ४’ चित्रपट आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. त्याचबरोबर, त्याचे आणखी दोन चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. शिवाय, ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटासह एका हिंदी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये तो व्यग्र आहे. ‘बॉईज ४’ मध्ये गौरव महत्वाच्या भूमिकेत असून तो यात काय धमाल करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.