Bigg Boss 17 Updates : ‘बिग बॉस’चे यंदाचे १७ वे पर्व बऱ्याच कारणांमुळे चर्चेत आले. पहिल्या दिवसापासूनच या शोमधील अनेक ट्विस्ट्समुळे हा शो चर्चिले गेला आहे. हा शो आता अंतिम टप्प्यात आला असून घरातील स्पर्धकांमध्येआता चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. अंतिम सोहळ्याआधी या शोमध्ये ‘फॅमिली स्पेशल’ आठवड्यामध्ये घरातील स्पर्धकांच्या जवळच्या व्यक्ती हजेरी लावणार आहेत..
‘बिग बॉस’च्या गेल्या भागांत मुन्नवर फारुकी व आयशा खान यांच्यात नॉमिनेशनवरुन भांडण इतके वाढले की, त्यांनी त्यांची वैयक्तिक आयुष्य मांडली. आयशा खानने मुनव्वरचा पर्दाफाश करताना अनेक खुलासे केले होते. त्यानंतर मुन्नवर खूप दुःखी व रडताना दिसला. कारण त्याला त्याच्या खाजगी आयुष्याबद्दलच्या गोष्टी टेलिव्हिजनवर मांडल्या जाणे, नको होते. अशातच आता मुन्नवरची बहिण अमरीन या शोमध्ये एण्ट्री करणार असून भावाला पाहून ती खूपच भावुक झाल्याची पाहायला मिळाली.
हेही वाचा – उदयपुरहून नवविवाहित जोडपं घरी परतलं, आमिर खानला पाहताच लोकांनी घेरलं अन्…., व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
‘बिग बॉस’च्या आगामी एपिसोडचा एक प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये मुन्नवरची बहीण ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करते. प्रवेश करताच ती घरातील सर्व सदस्यांना भेटते. त्यानंतर मुन्नवरला पाहताच ती रडू लागते आणि म्हणते की, “माझा भाऊ या शोमध्ये खूप रडला आहे.” यादरम्यान, ती मुन्नवरला मिठी मारत रडताना दिसली. त्यांना पाहून अभिषेक कुमारदेखील भावुक झाला असल्याचे दिसत आहे. पुढे अमरीन “मुन्नवर हा माझी नव्हेच, तर आमच्या कुटुंबाची शक्ती असल्याचेदेखील म्हटले आहे.
यावेळी तिने असं म्हटलं की, “मुन्नवर हा खूप भावनिक आहे. त्याला या अवस्थेत पाहून मला खूपच त्रास होत आहे. पण मला आशा आहे की, तो लवकरच या शोमधील खेळात परत येईल आणि त्याचा खेळ सुधारेल.” दरम्यान, या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी कमेंट्सद्वारे मुन्नवरला धीर देण्याच्या प्रयत्न केला आहे.