गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान व नुपूर शिखरे यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. अशातच ही जोडी नुकतीच विवाहबंधनात अडकली. याआधी ३ जानेवारीला नोंदणी पद्धतीने आयरा-नुपूर यांचं लग्न झालं होतं. त्यानंतर या दोघांचे बुधवार १० जानेवारी रोजी ख्रिश्चन पद्धतीने उदयपूरमध्ये शाही लग्न पार पडले. या शाही लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. अशातच त्यांचे आणखी काही फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आयरा-नुपूर त्यांच्या लग्नानंतर प्रथमच उदयपुर विमानतळावर स्पॉट झाले आहेत. आयरा-नुपूर त्यांच्या शाही लग्नानंतर मुंबईसाठी रवाना झाले आहेत. याच दरम्यान लग्नानंतर ते पहिल्यांदाच लोकांसमोर आले आहेत. यावेळी त्यांना उदयपूरच्या विमानतळावर पापाराझींनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. यावेळी आयराने काळ्या रंगाची शॉर्ट्स, एक निळा शर्ट आणि त्यावर एक लांब पांढरा लांब जॅकेट परिधान केला होता तर नुपूरने गुलाबी शर्ट, निळी जीन्स अनआय त्यावर काळ्या रंगाचे लेदर जॅकेट परिधान केले होते.
तर आमिर खानदेखील उदयपुरच्या विमानतळावर स्पॉट झाला. यावेळी त्याने निळ्या व पांढऱ्या रंगाचे पट्टे असलेला कुर्ता परिधान केला होता. तसेच यावेळी त्याने विमानतळावरील पोलिस व काही चाहत्यांसह फोटोही काढले. सोशल मीडियावर व्हायर होत असलेल्या व्हिडीओमद्धेऊं आमिरच्या या कृतीचे कौतुक होत आहे.
दरम्यान, आयरा-नुपूर शिखरे यांचं लग्न पार पडल्यानंतर आता जियो वर्ल्ड सेंटरमध्ये त्यांचे ग्रँड रिसेप्शन पार पडणार आहे. या ग्रँड रिसेप्शनला बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. येत्या १३ जानेवारी रोजी त्यांचं हे रिसेप्शन होणार असल्याचे म्हटले जात आहे.