रविवार, सप्टेंबर 6, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ऐतिहासिक चित्रपटात तेजस्विनी पंडित साकारणार जिजाऊंची भूमिका, पोस्टरने वेधले लक्ष, प्रेक्षकांकडूनही कौतुकाचा वर्षाव

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 12, 2024 | 11:34 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Actress tejaswini pandit new upcoming movie swarajya kanika jijau movie first look revealed poster shared on social media

ऐतिहासिक चित्रपटात तेजस्विनी पंडित साकारणार जिजाऊंची भूमिका, पोस्टरने वेधले लक्ष, प्रेक्षकांकडूनही कौतुकाचा वर्षाव

मराठीतील एक सुंदर व उत्तम अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित नाव अग्रगण्य आहे. तेजस्वीने चित्रपटांपासून वेबसीरिजपर्यंत सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमठवला आहे. त्याचबरोबर अभिनयासह निर्मिती क्षेत्रातही तिने आपली कारकीर्द केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडितची चांगलीच लोकप्रियता आहे. तिची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना भलतीच आवडते. तिचा चाहता वर्गदेखील मोठा आहे. त्यामुळे सर्वजण तेजस्विनीच्या आगामी प्रोजेक्ट्सची आतुरतेने वाट पाहात असतात. अशातच नुकतीच तिने तिच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली आहे. (Tejaswini Pandit On Instagram)

तेजस्विनीने तिच्या सोशल मीडियाद्वारे तिच्या आगामी ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली आहे. तेजस्विनी लवकरच राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले यांच्या जीवनावरील चरित्रपटाद्वारे चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. जगाला दिशा देणाऱ्या या जगत्जननीच्या आयुष्यावर आधारित ‘स्वराज्य कनिका जिजाऊ’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबद्दल दिग्दर्शिका अनुजा देशपांडे यांनी असे म्हटले आहे की, राजा नंतर घडतो, आधी घडते ती राजमाता. राजमाता जिजाऊसाहेब या लोकजीवनाला जोडणारी अस्मिता तर आहेतच पण त्याचबरोबर मराठी माणसाला त्याच्या अस्तित्वाची-सामर्थ्याची जाणीव करून देणारी एक शक्ती आहेत. हा अभिमान व जाणीव उराशी बाळगून वीरकन्या ते वीरमातेच्या जीवनकाळचे कथानक २-२.३० तासात मांडणे एक लेखिका म्हणून माझ्यासाठी आव्हानात्मक होते.”

View this post on Instagram

A post shared by 6 Fireflies Producttions (@6firefliesproducttions)

आणखी वाचा – Bigg Boss 17 : “ती काही रस्त्यावर राहत नव्हती…” अंकिता लोखंडेच्या सासूवर भडकली रश्मी देसाई, म्हणाली “त्यांचं लग्न टिकू नये असं…”

तर तेजस्विनी पंडीतने तिच्या भूमिकेबद्दल भावना व्यक्त करत असे म्हटले आहे की, “ज्या स्त्रीने गुलामगिरीच्या काळोखात जखडलेल्या हिंद प्रांताला स्वतंत्र राज्य – स्वराज्य मिळावे हे स्वप्न पहिल्यांदा पाहिले, त्यासाठी वर्षानुवर्ष त्या झिजल्या, त्या भूमिकेवर अटल राहिल्या. अशा राजमाता स्वराज्य जननी जिजाऊसाहेबांची भूमिका करायला मिळणं ही निश्चितच आनंदाची बाब आहे मात्र त्याहून जास्त जबाबदारी आहे ह्याची मला पूर्ण जाणीव आहे. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला, त्यांना घडवले ती माऊली स्वतः ताकदीची, पराक्रमी आणि दूरदृष्टीची असणार यात कसलेच दुमत नाही .अशा ह्या विलक्षण वीरमातेला पडद्यावर साकारणे हे माझे अहोभाग्यच.’’

आणखी वाचा – “मी तुमच्याबरोबर झोपले तर…”, मराठीत विचित्र मागणी करणाऱ्याला श्रुती मराठेचं सडेतोड उत्तर, म्हणाली, “तुमची बायको मुख्य अभिनेत्यासह…”

दरम्यान, नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर झळकले असून राजमाता जिजाऊ यांची करारी मुद्रा या पोस्टरद्वारे दिसत आहे. ६ फायरफ्लाईज प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अनुजा देशपांडे या करत आहेत. तसेच तेजस्विनीला जिजामाता भोसले यांच्या भूमिकेत पाहण्यासाठी तिचे अनेक चाहते मंडळी उत्सुक आहेत.

Tags: स्वराज्य कानिका जिजाऊमनोरंजन बातमीमराठी अभिनेत्रीमराठी मनोरंजनमराठी मनोरंजन बातमीमराठी बातमीमराठी चित्रपटतेजस्विनी पंडीतentertainment newsmarathi actressmarathi entertainmentmarathi entertainment newsmarathi moviesMarathi newsSwarajya Kanika Jijautejaswini pandit
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
Ira khan and nupur shikhare first appearance after udaipur wedding see the details

उदयपुरहून नवविवाहित जोडपं घरी परतलं, आमिर खानला पाहताच लोकांनी घेरलं अन्...., व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.