अभिनेत्री तसेच दिग्दर्शिका आणि लेखिका अशी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची ख्याती आहे. मृणाल यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. नाटक आणि दूरदर्शनच्या जगतात त्या एक प्रतिभासंपन्न कलावंत म्हणून ओळखल्या जातात. त्या विख्यात साहित्यिक गो.नी. दांडेकरांच्या नात आहेत. तसेच त्यांचे वडील पुण्यातील एस.पी महाविद्यालयाचे प्राचार्य होते. तर त्यांच्या आई शाहू महाविद्यालयात मराठी साहित्य शिकवायच्या. व्यवसायाने वकील असलेल्या रुचिर कुलकर्णी सोबत त्यांचा विवाह झाला. मृणाल यांनी शाहू महाविद्यालयातचं पार्ट टाइम जॉब म्हणून लेक्टररची नोकरी केली. (Mrinal Kulkarni Unknown Fact)

मृणाल सांगते “आई बाबांना लहानपणापासून बघत असल्यामुळे मलाही प्राध्यापक व्हायचं होतं.” आणि आता मृणाल जेव्हा कधी मागे वळून बघते. तेव्हा ती चेष्टेने म्हणते त्यांच्या अभिनयाची सुरुवात कॉलेजमध्ये शिकवण्यापासूनच झाली होती. कारण अभिनय करताना प्रेक्षकांना ताब्यात कसं ठेवायचं हे त्या तिथेच शिकल्या. तेव्हा मृणाल खूप स्कॉलर असल्या सारखा अभिनय करायच्या असं त्यांनी सांगितलं आहे.
हे देखील वाचा: राखीचा नवा लुक पण चिमुरड्याची उडाली झोप
मृणाल यांच्या अभिनयाची सुरुवात मराठी दूरदर्शनवरील “स्वामी” या मालिकेपासून झाली. तेव्हा त्या बारावीत शिकत होत्या. स्वामीमध्ये त्यांनी माधवराव पेशवे यांच्या पत्नी रमाबाईंची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे मृणाल कुलकर्णी यांचे नाव घरोघरी पोचले. दरम्यान मृणाल यांचा द्रौपदी, हसरते, मीराबाई, टीचर, खेल, स्पर्श, सोनपरी इत्यादी मालिकांमधून त्यांचा अभिनय खुलत गेला. अल्फा मराठी वाहिनीवरील अवंतिका या मालिकेतील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पोचपावती मिळाली. मृणाल कुलकर्णी यांनी प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं या चित्रपटापासून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले,या चित्रपटानंतर त्यांनी श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित रमा माधव या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या दोन्ही चित्रपटात त्यांनी दिग्दर्शनासोबातच अभिनय देखील केला आहे. (Mrinal Kulkarni Unknown Fact)

हे देखील वाचा: ‘चंद्रमुखी’ने खूप काही शिकवलं,वर्ष पूर्ण होताच व्यक्त झाले कलाकार
मृणालने आजवर अनेक मालिका तसेच, चित्रपटामध्ये काम केलं आहे, परंतु मृणाल याना खरी ओळख स्वामींनी या मालिकेपासूनच मिळाली. मृणाल यांना लग्नानंतर स्वामी ही मालिका मिळाली होती. या मालिकेत काम करण्यासाठी रुचिर कुलकर्णी यांनी मृणाल यांना नकार दिला नाही, या उलट प्रोत्साहन दिलं. मृणाल यांच्या घरात पहिल्या पासूनच साहित्य आणि कलाविषयक वातावरण जरी होतं, तरी मृणाल यांनी अभिनय क्षेत्रात येण्याचा कधी विचाराचं केला न्हवता. अशातच मृणाल यांना स्वामींनी मालिकेची ऑफर आली होती. मृणाल सांगतात, त्यांना या मालिकेमुळे सगळ्या लोकांकडून आदराची वागणूक मिळाली.