मनोरंजन, मनोरंजन आणि मनोरंजन असं म्हंटल्यावर एनर्जीचा धमाका म्हणजे अभिनेत्री राखी सावंत हे नाव येतच. सतत चर्चेत असणारी आणि प्रेक्षकांच्या नजरेत राहणारी अशी ही एक अभिनेत्री आहे. कधी बिग बॉस मुळे तर कोणत्या ना कोणत्या कॉनट्रेव्हरसी मध्ये राखी सावंत हे नाव असतंच. (Rakhi Sawant Horror Look)
हिंदी बिगबॉसचे अनेक सीजन राखीने चांगलेच गाजवले. त्या नंतर मराठी बिग बॉसच्या सीजन चार मध्ये राखीने जो धुमाकूळ घातला त्याने घरातील इतर सदस्यांसोबत प्रेक्षक ही हैराणच होते.तीच अमृताच्या अंगावर पीठ टाकणं असो नाही तर तिचा मंजोलीका चा लुक असूदेत असे अनेक किस्से तिने त्या घरात केले. याच सोबत अभिनेता किरण माने यांच्या सोबत तीच चांगलं बॉण्डिंग पाहायला मिळालं. घर बाहेर आल्या नंतर आदिल सोबतच्या राखीच्या लग्नाची मोठी कॉनट्रेव्हरसी चांगलीच रंगली, त्या नंतर राखीच्या आई चे निधन झाले, तो मुद्दा ही सोशल मीडियावर उचलून धरला होता. (Rakhi Swant Horror Look)
पाहा काय घडलं नक्की ? (Rakhi Sawant Horror Look)
सध्या ती अनेक वेगवेगळे लुक करून प्रेक्षकांसमोर येत असते. तिचे असे अनेक व्हिडिओज सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्या व्हिडिओ मध्ये तिने पिवळ्या रंगाचा घागरा घातला आहे. भरपूर दागिने आणि हेवी मेकअप केलेला पहायला मिळतोय. त्या व्हिडिओ मध्ये ती एका लहान मुलाला उचलून घेते. परंतु ते बाळ तिला बघून घाबरून रडायला लागत. तर दुसऱ्या बाजूला राखी ही त्यामुलाला बघून ओरडायला लागते. नक्की कोण कोणाला घाबरत आहे हेच कळून येत नाही आहे. (Rakhi Sawant Horror Look)
हे देखील वाचा : “पब्लिसिटीसाठी धर्माचा वापर”रोजा मोडल्याने राखी सावंतवर संतापले नेटकरी