मराठी इंडस्ट्रीतील आदराने घेतलं जाणार नाव म्हणजे मृणाल कुलकर्णी. अष्टपैलू आणि एव्हर ग्रीन अभिनेत्री म्हणून मृणाल कुलकर्णी यांच्याकडे पाहिलं जात. अभिनय, लेखन, दिग्दर्शन प्रत्येक क्षेत्रात त्यांनी त्यांचा ठसा उमटवला आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात मराठी दूरदर्शन वरील ‘स्वामी’ या मालिकेतून केली. त्यानंतर त्यांनी ‘श्रीकांत’, ‘द ग्रेट मराठा’, ‘मीराबाई’ यांसारख्या अनेक मालिका केल्या. ‘सोनपरी’ या मालिकेतून तर त्यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमच घर केलं. अल्फा मराठी वरील त्यांच्या ‘अवंतिका’ या मालिकेतील अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.(Mrinal Kulkarni Raj Kapoor)
छोट्या पडद्याप्रमाणे, रुपेरी पडद्यावर ही मृणाल कुलकर्णीने त्यांचं नाव केलं. ‘माझं सौभाग्य’, ‘वीर सावरकर’,’कशाला उद्याची बात’, ‘तुझ्या माझ्यात’, ‘फर्जंद’, ‘शेर शिवराज’, ‘पावनखिंड’ असे अनेक मराठी तर ‘कमला की मौत’, ‘कुछ मिठा हो जाये’, ‘राजा शिवछत्रपती’, ‘द कश्मीर फाईल्स’ यांसारखे अनेक हिंदी चित्रपट ही केले. अभिनयाबरोबरच त्यांनी लेखिका आणि दिग्दर्शिका म्हणून ही पदार्पण केले. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत हा त्यांनी लिहलेला आणि दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट आहे. त्यानंतर त्यांनी माधवराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित ‘रमा माधव’ हा देखील मराठी चित्रपट केला. या दोन्ही चित्रपटांमध्ये त्यांनी दिग्दर्शनासोबत अभिनय देखील केला आहे. मल्टिटास्किंग म्हणतात ते हेच.

पहा मृणाल यांनी का दिला होता नकार(Mrinal Kulkarni Raj Kapoor)
असे जरी असले तरी प्रत्येक कलाकार जस जसा मोठा होतो त्या प्रवासात त्याला अनेक निर्णय घ्यावे लागतात, कोणत काम घ्यावं कोणत काम नाकारावे हे ठरवावे लागते. प्रत्येक कलाकाराची आपापली अशी काही तत्व असतात आणि काम करताना ती तत्व जपण्याचा प्रयत्न कलाकार करत असतो. याच संदर्भातील मृणाल कुलकर्णींचा एक किस्सा ललिता ताम्हणे यांनी त्यांच्या ‘चंदेरी सोनेरी’ या पुस्तकात सांगितला आहे.
मृणाल कुलकर्णींचा मुलगा विराजस दोन-अडीच वर्षांचा असताना त्यांना संजय खानच्या ‘ग्रेट ‘मराठा’ मालिकेची ऑफर आली होती. संजय खानने स्वतः फोन करून त्यांना म्हटलं होतं- “एकदा तरी येऊन भेट.” अहिल्याबाई होळकरांच्या भूमिकेसाठी त्यांना सगळ्यांनीच मृणालजींचं नाव सुचवलं होतं. त्यावेळी मृणाल खूप द्विधा मनःस्थितीत होत्या. एक तर मुलगा लहान होता. त्यातून याच क्षेत्रात करिअर करण्याचा त्यांनी तोपर्यंत विचारसुद्धा केलेला नव्हता. पण त्यांच्या सासूबाईंनी त्यांना खूप प्रोत्साहन दिलं. त्या मृणालना म्हणाल्या-‘”चांगली ऑफर आहे. एकदा भेटून बघ, ” खूप विचारांती त्यांनी ती भूमिका स्वीकारली.(Mrinal Kulkarni Raj Kapoor)

मृणाल कुलकर्णींना तेव्हा हिंदी चित्रपटांच्या खूप ऑफर्स येत होत्या. पण त्यांना टिपिकल हिंदी चित्रपट करायचेच नव्हते. मृणालजींच्या म्हणण्याप्रमाणे-‘“माझ्याकडे ती मेंटॅलिटीच नव्हती. मी माझ्या घरातले संस्कार, आपली संस्कृती विसरू शकत नव्हते. विवाहित स्त्री म्हणून माझ्यावर कुठलीही बंधनं नसली, तरी ग्लॅमरच्या नावाखाली वाट्टेल ते करणं मला मान्य नाही.. टिपिकल हिंदी नायिकेच्या भूमिकेसाठी जे करायला लागतं, ते करायची माझी तेव्हाही तयारी नव्हती, आजही नाही!” आणि म्हणूनच, ‘स्वामी’ नंतर मृणाल यांनी राज कपूरच्या ‘हीना’ची ऑफर आलेली असूनही त्यांनी फोनवरच स्पष्ट शब्दांत नकार दिला होता. भूमिका कुठली, हेसुद्धा त्यांनी विचारलं नव्हतं. ‘जे करायचंच नाही, त्याचा विचार तरी कशाला करायचा?’ असं त्यांचं म्हणणं होतं. मृणाल त्यांच्या वयाच्या अभिनेत्रींपेक्षा वेगळ्या ठरतात, त्या याचमुळे!
हे देखील वाचा – तीन पांढऱ्या केसांचे राजकुमार, सुत्तरफेणी+सुत्तरफेणी+सुत्तरफेणी..
राज कपूर हे बॉलिवूड चे ‘शो मॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते आणि दिग्दर्शक होते. वयाच्या चोविसाव्या वर्षी त्यांनी स्वतःचा प्रोडक्शन स्टुडिओ सुरु केला म्हणून ते भारतातील सर्वात तरुण दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. ‘आग’, ‘बरसात’, ‘मेरा नाम जोकर’, ‘प्रेम रोग’, ‘राम तेरी गंगा मैली’ यांसारखे अनेक चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. ‘पदमभूषण’, ‘दादासाहबे फाळके’ या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते. १९८८ साली त्यांनी जगाचा निरोप घेतला.