शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Meraj Zaidi Death : प्रसिद्ध लेखक मेराज जैदी यांचे निधन, वयाच्या ७६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 1, 2024 | 3:35 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Meraj Zaidi passes away at the age of 76 see the details

प्रसिद्ध लेखक मेराज जैदी यांचे निधन, वयाच्या ७६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Meraj Zaidi Death : मनोरंजन विश्वातून गेले काही दिवस निधनाचे वृत्त सातत्यानेच येत आहेत. नुकतेच ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचे निधन झाले. चाहते मंडळी या दु:खातून सावरलेही नाहीत तोपर्यंत मनोरंजन विश्वातून आणखी एक दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध लेखक, गीतकार व अभिनेते मेराज जैदी  यांचे निधन झाले आहे.

‘झांसी की राणी’ यासंह अनेक टीव्ही मालिकांच्या लिखाण करणारे प्रसिद्ध लेखक मेराज जैदी यांच्या निधनाचे वृत्त समोर येत आहे. मेराज जैदी  यांनी ‘झांसी की राणी’, ‘​​वीर शिवाजी’, ‘शोभा सोमनाथ की’, ‘आपकी अंतरा’, ‘राजा का बाजा’ यांसारख्या अनेक गाजलेल्या टीव्ही मालिकांचे लेखन व संवाद लिहिले होते. 

आणखी वाचा – अंबानी कुटुंबियांच्या कार्यक्रमात गाणारी रिहाना नेमकी आहे तरी कोण?, जगभरात रंगली चर्चा, तिची एकूण कमाई आहे तब्बल…

मेराज जैदी  हे केवळ उत्कृष्ट लेखकच नव्हते तर ते देशातील एक प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक, गीतकार आणि अभिनेतेदेखील होते. हॉलिवूड चित्रपट ‘गोंगर २’ सह अनेक मालिका व चित्रपटांमध्येही त्यांनी आपले अभिनय कौशल्य दाखवले होते. प्रयागराजमधील दांडुपूर येथील राहत्या घरी मेराज यांनी अखेरचा श्वास घेतला. ते एकूण ७६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते खूप आजारी होते आणि अखेर आज त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला.

आणखी वाचा – Video : अनंत अंबानीच्या लग्नासाठी राजकीय मंडळीही तयार, अमृता फडणवीसांच्या कपड्यांची रंगली सर्वाधिक चर्चा, ड्रेसिंग पाहून लोकही भडकले

मेराज जैदी  यांचे शिष्य असलेले प्रयागराज येथील लोकसंस्कृती विकास संस्थेचे संचालक शरद कुमार आणि केरू येथे काम करणारे त्यांचे सहाय्यक लेखक यांनी दिवंगत लेखकाच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, मेराज झैदी यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहते मंडळींमध्ये व कलाविश्वात शोककळा पसरली आहे. अनेकांनी त्यांच्या निधनावर सोशल मीडियाद्वारे दु:ख व्यक्त केले असून अनेकांनी त्यांना श्रद्धांजलीदेखील वाहिली आहे. दरम्यान, मेराज जैदी  यांच्या पश्चात तीन मुले व दोन मुली आहेत.

Tags: Bollywood Writerdeath newsJhansi Ki RaniMeraj Zaidiझासी की राणीनिधन बातमीबॉलिवूड लेखकमिराज जैदी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Anant ambani not to marry anyone before meeting radhika merchant see the details

"एका आजाराशी झुंज...", अनंत अंबानीला करायचं नव्हतं लग्न, लग्नापूर्वीच मोठा खुलासा, स्वतःच म्हणाला, "तिच्या कुटुंबाने मला..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.