Meraj Zaidi Death : मनोरंजन विश्वातून गेले काही दिवस निधनाचे वृत्त सातत्यानेच येत आहेत. नुकतेच ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचे निधन झाले. चाहते मंडळी या दु:खातून सावरलेही नाहीत तोपर्यंत मनोरंजन विश्वातून आणखी एक दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध लेखक, गीतकार व अभिनेते मेराज जैदी यांचे निधन झाले आहे.
‘झांसी की राणी’ यासंह अनेक टीव्ही मालिकांच्या लिखाण करणारे प्रसिद्ध लेखक मेराज जैदी यांच्या निधनाचे वृत्त समोर येत आहे. मेराज जैदी यांनी ‘झांसी की राणी’, ‘वीर शिवाजी’, ‘शोभा सोमनाथ की’, ‘आपकी अंतरा’, ‘राजा का बाजा’ यांसारख्या अनेक गाजलेल्या टीव्ही मालिकांचे लेखन व संवाद लिहिले होते.
![](https://marathi.itsmajja.com/wp-content/uploads/2024/03/image-3.png)
मेराज जैदी हे केवळ उत्कृष्ट लेखकच नव्हते तर ते देशातील एक प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक, गीतकार आणि अभिनेतेदेखील होते. हॉलिवूड चित्रपट ‘गोंगर २’ सह अनेक मालिका व चित्रपटांमध्येही त्यांनी आपले अभिनय कौशल्य दाखवले होते. प्रयागराजमधील दांडुपूर येथील राहत्या घरी मेराज यांनी अखेरचा श्वास घेतला. ते एकूण ७६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते खूप आजारी होते आणि अखेर आज त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला.
मेराज जैदी यांचे शिष्य असलेले प्रयागराज येथील लोकसंस्कृती विकास संस्थेचे संचालक शरद कुमार आणि केरू येथे काम करणारे त्यांचे सहाय्यक लेखक यांनी दिवंगत लेखकाच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, मेराज झैदी यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहते मंडळींमध्ये व कलाविश्वात शोककळा पसरली आहे. अनेकांनी त्यांच्या निधनावर सोशल मीडियाद्वारे दु:ख व्यक्त केले असून अनेकांनी त्यांना श्रद्धांजलीदेखील वाहिली आहे. दरम्यान, मेराज जैदी यांच्या पश्चात तीन मुले व दोन मुली आहेत.