प्रत्येकाची अशी आपल्या घराची गोष्ट असते. सर्वसामान्यनापासून ते कलाकार मंडळींपर्यंत प्रत्येकजण हा आपल्या घराशी जोडला गेलेला असतो. नवं घर घेलटल्यानंतर त्या वास्तूची पूजा, त्या वास्तूचे काही खास फोटोस सगळेच जण सोशल मीडियावरून शेअर करतात. अशातच मालिकाविश्वात लोकप्रिय असणाऱ्या अभिनेत्रीने स्वतःच घर घेतलं आहे. याची खुशखबर तिने सोशल मीडियावरून व्हिडीओ पोस्ट करून दिली. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे काजल काटे.(Mazi Tuzi Reshimgath Story)
छोट्या पडद्यावरून घराघरात पोहोचलेल्या काजल काटेने नवं घर घेतल्याची गुडन्यूज सोशल मीडियावरून शेअर केली आहे. या तिच्या नव्या घरात तिने तिच्या पतीसह वास्तुशांतीची पूजा केली असून त्याचा व्हिडीओ तिने पोस्ट केला आहे. या व्हिडिओमधून काजलच्या नव्या आलिशान घराची झलक पाहायला मिळतेय.
पाहा काजलच्या नव्या घराची अनोखी झलक (Mazi Tuzi Reshimgath Story)
काजलने नवीन घराचा व्हिडीओ शेअर करत “घर…सुख कळले…प्रतिक काजल करुणा” असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओला तिने सुख कळले हे गाणंही दिलं आहे. काजलच्या या व्हिडीओवर माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील कलाकारांनी कमेंट करून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने कमेंट करत “अभिनंदन…तुला प्रेम आणि सुख मिळो” असं म्हटलं आहे.
तर अभिनेत्री शीतल क्षीरसागर हिने, व्वा… मनःपूर्वक अभिनंदन प्रिय काजल आणि प्रतीक.. तुमच्या या नवीन घरात खूप आनंद, समृद्धी आणि उत्तम आरोग्य येवो…तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत… वास्तु देवताय नमः असं म्हणत कमेंट केली आहे. शिवाय काजलच्या चाहत्यांनीही कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.(Mazi Tuzi Reshimgath Story)
हे देखील वाचा – निवेदिता ताईंची विवेकला खास भेट
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील भूमिकेमुळे काजलला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. ही मालिकाही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत होती. या मालिकेनंतर आता काजल मुरंबा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.
