मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या अनेक कलाकारांमध्ये एक नाव हमखास घेतलं जात ते म्हणजे सगळ्यांचे लाडके अभिनेते अशोक सराफ उर्फ अशोक मामा. अशी हि बनवा बनवी, बाळाचे बाप ब्रम्हचारी, बिनकामाचा नवरा अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांमधून मामांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. पण चित्रपट सृष्टी गाजवणाऱ्या महानायकाने नुकतीच एक खंत व्यक्त केली आहे.(Ashok saraf)
बाई पण भारी देवा चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी मीडिया सोबत संवाद साधताना एक खंत व्यक्त केली आहे. या वेळी अशोक सराफ यांना आता तुम्ही कोणत्या चित्रपटात किंवा नाटकात पाहायला मिळणार आहात? असा प्रश्न करण्यात आला तेव्हा अशोक सराफ म्हणाले आता माझ्याकडे त्या दर्जाच लिखाण येतच नाही. माझ्या दर्जाचं लिहिणारं सध्या तरी मला कोणी दिसत नाही असं ते म्हणाले.
पुढे अशोक मामांनी भावना व्यक्त सांगितलं आता माझ्या कडे नायकाच्या भूमिका येणार नाहीस किंवा ज्या येतील त्या विनोदी व्यक्तिरेखा असतील. आता चित्रपटात केवळ मी बापाच्या भूमिकेतच दिसेन. माझ्या दर्जाचा विनोद किंवा लेखन आता उरल नाही. लोकांना असं वाटत मी केवळ विनोदी अभिनेता आहे इतर हि भूमिका मी करू शकतो हे बहुदा लोकांना माहिती असं देखील मामा म्हणाले.(Ashok saraf)
तसेच या वेळी अशोक सराफ यांनी सध्या चित्रपटांमध्ये होणाऱ्या विनोदावर ही टीका केली हल्लीच्या विनोदाला विनोद म्हणणं हे स्वतःला फसवण्यासारखं आहे असं म्हणत अशोक सराफ यांनी खदखदव्यक्त केली.
अशोक सराफ यांच्या सारख्या महानायकाने मांडलेली ही खंत अनेकांना विचारत पडणारी आहे.