महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सक्रिय राजकारणी म्हणून शरद पवार यांचे नाव आग्रहाने घेतले जाते. अशातच लोकसभा २०२४च्या निवडणुका या अगदी तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुका या सर्वांसाठीच महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षासाठी ही अस्मितेची लढाई झाली आहे आणि या लढाईत शरद पवार यांचाही अगदी सक्रिय सहभाग पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकांसाठी मतदान हे शेवटच्या काही टप्प्यात आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्यासाठी शरद पवारांची बारामतीमध्ये सांगता सभादेखील झाली. पण त्यानंतर शरद पवारांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या २० दिवसांपासून ते प्रचाराच्या कामात स्वत:ला झोकून देऊन काम करत होते. तर, राज्यातील बहुतांश जिल्ह्यात त्यांनी जाहीर सभांमधून जनतेला संबोधित केलं. त्यामुळे निवडणुकीच्या या रणधुमाळीत त्यांची तब्येत बिघडली आहे. त्यांचा घसा बसला असून प्रकृती अस्वास्थेमुळे त्यांना आरामाचा सल्ला देण्यात आला आहे. अशातच शरद पवारांच्या प्रकृतीवर आता दिग्दर्शक हेमंत ढोमेने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आदरणीय साहेब…
— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) May 5, 2024
आपली मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी आम्हा तरूणांना देखील थक्क करणारी आहे…
पण कृपया स्वतःची काळजी घ्या… तब्येत जपा…
खंडोबा आपणांस लवकरात लवकर बरे करो… 🙏🏽 pic.twitter.com/wxhkmQn8bL
हेमंत ढोमेने शरद पवारांबद्दलची एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. तसेच या पोस्टद्वारे त्याने शरद पवारांना तबयेतीची काळजी घेण्याची विनंतीही केली आहे. हेमंतने एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) ट्विट करत शरद पवारांच्या प्रकृतीविषयी भाष्य केलं आहे. यामध्ये त्याने म्हटलं आहे की, “आदरणीय साहेब, आपली मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी आम्हा तरुणांनादेखील थक्क करणारी आहे. पण कृपया स्वतःची काळजी घ्या… तब्येत जपा… खंडोबा आपणांस लवकरात लवकर बरे करो.”
हेमंतची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याच्या पोस्टला नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे. तसेच त्याच्या या पोस्टखाली कमेंट्समध्ये अनेकांनी शरद पवारांना काळजी घेण्याचे आवाहन व विनंती केली आहे. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी साधलेल्या संवादात आता शरद पवारांची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले आहे.