छोट्या पडद्यावरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प’ या लोकप्रिय कार्यक्रमाचं पहिलं पर्व चांगलंच गाजलं होतं. कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वातील अनेक गायक आज आघाडीच्या गायकांमध्ये नावाजलेले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे कार्तिकी गायकवाड. कार्तिकीने कार्यक्रमात तिच्या सुमधुर स्वरांनी रसिक प्रेक्षकांना मोहिनी घातली आणि या पर्वाचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर ती विविध कार्यक्रम व चित्रपटांमध्ये गायलेल्या गाण्यांनी संगीतप्रेमींचं मनोरंजन केलं. ती जितकी तिच्या कामामुळे चर्चेत राहते, तितकीच ती तिच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. (Kartiki Gaikwad and her husband buys a new Car)
कार्तिकी गायकवाड व्यायवसायिक रोनित पिसेसह विवाहबंधनात अडकली. लग्नानंतर कार्तिकीचा संसार सुरळीत सुरु असून तिच्या परदेश वारीची, तसेच पतीबरोबरच्या फोटोशूटची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होते. काही दिवसांपूर्वी कार्तिकीने आलिशान कार खरेदी केली होती. आता तिच्या ताफ्यात आणखी एका कारचा समावेश केला आहे. कार्तिकीचा पती रोनित पिसेने नुकतंच नवी कोरी कार खरेदी केली. त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटोज व व्हिडीओ शेअर करत ही आनंदाची बातमी त्याने चाहत्यांना दिली आहे.
हे देखील वाचा – सायली-अर्जुनमधील रोमॅंटिक क्षणच ठरणार त्यांच्यातील खोट्या नात्यास कारण, अस्मिताचा संशय ठरणार खरा, पाहा व्हिडीओ
‘आमच्या ताफ्यात आणखी एका कारची भर पडली’ असं कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिलं आहे. शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये रोनित कार खरेदीची प्रक्रिया पूर्ण करत आहे. त्यानंतर कार्तिकी व रोनित, दोघांचे आई-वडील या कारची पूजा करताना दिसत आहे. पुढे रोनित ही कार चालवताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर शेअर केलेल्या फोटोमध्ये दोन्ही कुटुंबियांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो.
हे देखील वाचा – फुलांची सजावट, पंचपक्वान्न पारंपारिक लूक अन्…; देशमुख कुटुंबीयांनी केलं प्रसाद-अमृताचं केळवण, घेतला उखाणा, म्हणाली, “चांदीच्या ताटात पुरणपोळी…”
दरम्यान, रोनितने खरेदी केलेल्या या कारची किंमत साधारण १५ लाखांच्या आसपास आहे. कार्तिकीने शेअर केलेल्या या पोस्टवर तिच्या कुटुंबियांसह चाहत्यांनीही कमेंट करत कार्तिकी-रोनित आणि त्यांच्या कुटुंबियांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. कार्तिकीचा पती रोनित पिसे हा मॅकेनिकल इंजिनिअर असून त्याचे अनेक स्टार्टअप्स कंपनीदेखील आहे.