मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यातील बऱ्याच अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी नकारात्मक भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. त्यातील एक अभिनेत्री म्हणजे स्वाती देवल. ‘झी मराठी’वरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील मिनाक्षी या भूमिकेतून तिने फार कमी वेळात प्रेक्षकांची मनं जिंकली. खलनायिकेच्या भूमिका असूनही तिला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. यापूर्वी स्वातीने विविध मालिकांमध्ये काम करत आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला आहे. सध्या ती ‘सोनी मराठी’वरील ‘राणी मी होणार’ या मालिकेत काम करताना दिसत आहे. स्वातीचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. कामाव्यतिरित्य विविध वैयक्तिक आयुष्यातील क्षण ती फोटो व व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसते. नुकतंच तिने एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती बेभान नाचताना दिसत आहे. (Swati deval dance on devicha udo udo song)
सध्या नवरात्रोत्सव सुरु आहे. सगळ्या सणांप्रमाणे हा सणही कालाकार मंडळी मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसतात. स्वातीनेही हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात ती देवीच्या उदो उदो गाण्यावर बेभान नाचताना दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत स्वाती लिहीते, ‘अष्टमीच्या शुभेच्छा… सर्दी, खोकला, ताप… पण देवीचा उदो उदो केला की संचारतच…’, असं लिहीत तिने या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे. यातून तिने व्हिडीओ मागील परस्थिती आणि तिची अवस्था सांगितली आहे.
स्वाती मागील काही दिवस आजारी होती. तिला सर्दी, खोकला आणि चांगलाच ताप आला होता. अशावेळी अंधरुणातून उठू नये असं प्रत्येकाला वाटतं. पण या व्हिडीओतील परिस्थिती पाहत्या तिच्या अंगात देवीचं ‘उदो उदो’ गाणं लागताच साक्षात देवीची ऊर्जा संचारावी असं वाटतं. सध्या हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर बराच व्हायरल होत आहे.
नेटकऱ्यांनीही या व्हिडीओवर लाईक व कमेंटचा वर्षाव केला आहे. काहींना तर तिचा हा डान्स इतका आवडला की एकाने कमेंट करत लिहीलं की, ‘पूर्ण गोंधळ शूट करुन टाका’, असं सांगत विनंती केली. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहीलं, ‘रॉकेट सादरीकरण स्वातीजी. देवीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहू दे अशी प्रार्थना’, असं लिहीलं आहे. तर एकाने विनोदी कमेंट केली, ‘तुमच्या खाली राहणारे तक्रार करायला येत नाही का असा डान्स केल्यावर आमचे तर येतात’, असं लिहीलं आहे.