‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील अल्पावधीतच लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे ‘ठरलं तर मग’. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेतील सर्व पात्रांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा मिळवली आहे. त्यामुळे प्रेक्षकांकडून या मालिकेला भरभरून प्रेम मिळत आहे. मालिकेतील अर्जुन-सायलीच्या नात्यातील गोडवा प्रेक्षकांना खूप भावतो. ही मालिका अर्जुन-सायलीच्या लग्नाच्या कॉन्ट्रॅक्ट या कथेभोवती फिरत आहे. सध्या या मालिकेत विविध वळणं येत आहेत. एकीकडे सायली-अर्जुनमध्ये खूप चांगली मैत्री होताना पाहायला मिळते तर दुसरीकडे या दोघांमध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी प्रिया सतत वेगवेगळे डावपेच रचत आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये प्रेक्षकांना मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. (tharala tar mag new twist)
नुकतंच ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर बाप्पाचं आगमन झालं होतं. २९ सप्टेंबरला या संबंधित बाप्पाच्या विसर्जनासाठीचा विशेष भाग पाहायला मिळणार आहे. याचा नवा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला. यात बाप्पाच्या मिरवणूकीबरोबर मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. मालिकेतील नायिका म्हणजेच सायलीवर विसर्जन मिरवणुकीत एका अनोळख्या व्यक्तीकडून जीवघेणा हल्ला झाला असल्याचं पहायला मिळणार आहे.

प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे की, गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणूक चालू असते. सगळे जोशात नाचताना दिसतात. तेवढ्यात सायली एका अनोळखी व्यक्तीला हातात चाकू घेऊन आलेला पाहते. तितक्यात तिच्यावर तो अज्ञात व्यक्ती सायलीच्या पोटावर धारदार चाकूने वार करतो. सायली ‘अहो… ‘अशी अर्जुनला हाक मारत खाली पडते.

पुढे अज्ञात व्यक्ती पुढचा हल्ला करणार इतक्यात अर्जुन सायलीवर केलेला वार हाताने रोखतो आणि तिला सावरतो. त्यावेळी त्याच्या हाताला जखम होते. या सर्व प्रसंगात त्याच्या हातातून आलेलं रक्त तिच्या भांगात पडताना प्रोमोत पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुढे अर्जुन सायलीचा जीव कशाप्रकारे वाचवतो हे पाहणं रंजक ठरणार आहे.