गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Tharal Tar Mag New Promo: कोणी केला सायलीवर जीवघेणा हल्ला?, सायलीला अर्जुन वाचवू शकेल का ?

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 26, 2023 | 1:10 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
tharala tar mag new twist

tharala tar mag new twist

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील अल्पावधीतच लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे ‘ठरलं तर मग’. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेतील सर्व पात्रांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा मिळवली आहे. त्यामुळे प्रेक्षकांकडून या मालिकेला भरभरून प्रेम मिळत आहे. मालिकेतील अर्जुन-सायलीच्या नात्यातील गोडवा प्रेक्षकांना खूप भावतो. ही मालिका अर्जुन-सायलीच्या लग्नाच्या कॉन्ट्रॅक्ट या कथेभोवती फिरत आहे. सध्या या मालिकेत विविध वळणं येत आहेत. एकीकडे सायली-अर्जुनमध्ये खूप चांगली मैत्री होताना पाहायला मिळते तर दुसरीकडे या दोघांमध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी प्रिया सतत वेगवेगळे डावपेच रचत आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये प्रेक्षकांना मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. (tharala tar mag new twist)

नुकतंच ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर बाप्पाचं आगमन झालं होतं. २९ सप्टेंबरला या संबंधित बाप्पाच्या विसर्जनासाठीचा विशेष भाग पाहायला मिळणार आहे. याचा नवा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला. यात बाप्पाच्या मिरवणूकीबरोबर मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. मालिकेतील नायिका म्हणजेच सायलीवर विसर्जन मिरवणुकीत एका अनोळख्या व्यक्तीकडून जीवघेणा हल्ला झाला असल्याचं पहायला मिळणार आहे.

आणखी वाचा – Video: ‘औक्षण, केक आणि मज्जा-मस्ती’, असा साजरा केला मित्रपरिवाराने वैभव तत्तववादीचा वाढदिवस, पोस्ट करत म्हणाला, “प्रत्येक क्षण जगण्यासाठी…”

प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे की, गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणूक चालू असते. सगळे जोशात नाचताना दिसतात. तेवढ्यात सायली एका अनोळखी व्यक्तीला हातात चाकू घेऊन आलेला पाहते. तितक्यात तिच्यावर तो अज्ञात व्यक्ती सायलीच्या पोटावर धारदार चाकूने वार करतो. सायली ‘अहो… ‘अशी अर्जुनला हाक मारत खाली पडते.

आणखी वाचा – ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’च्या सेटवर फावल्या वेळेचा केला जातो असा वापर, अभिनेत्रीने शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल

पुढे अज्ञात व्यक्ती पुढचा हल्ला करणार इतक्यात अर्जुन सायलीवर केलेला वार हाताने रोखतो आणि तिला सावरतो. त्यावेळी त्याच्या हाताला जखम होते. या सर्व प्रसंगात त्याच्या हातातून आलेलं रक्त तिच्या भांगात पडताना प्रोमोत पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुढे अर्जुन सायलीचा जीव कशाप्रकारे वाचवतो हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Tags: Arjun next movemarathi serialnew twistTharala tar mag
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Mission Raniganj Trailer out

Mission Raniganj Trailer : कोळशाची खाण अन् ६५ कामगारांना वाचवण्याची धडपड, अक्षय कुमारचा बहुचर्चित 'मिशन राणीगंज'चा ट्रेलर पाहिलात का ?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.