गुरूवार, मे 15, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video: ‘औक्षण, केक आणि मज्जा-मस्ती’, असा साजरा केला मित्रपरिवाराने वैभव तत्तववादीचा वाढदिवस, पोस्ट करत म्हणाला, “प्रत्येक क्षण जगण्यासाठी…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 25, 2023 | 5:09 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Vaibhav tatwawadi share a video of him birthday

Vaibhav tatwawadi share a video of him birthday

वैभव तत्त्ववादी हा मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात वेगळा ठसा उमटवला. ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’, ‘व्हॉट्स अप लग्न’, ‘भेटली तू पुन्हा’ यासारख्या अनेक चित्रपटात त्याने काम केलं आहे. आता त्याचा ‘तीन अडकून सिताराम’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याने या क्षेत्रात सुरुवात मात्र नाट्य अभिनेता म्हणून केली होती. त्याचा आज वाढदिवस आहे त्यामुळे त्यानिमित्त शेअर केलेला व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. (Vaibhav tatwawadi share a video of him birthday)

वैभव सोशल मीडियावर बरंच सक्रिय असतो. कामासह वैयक्तिक आयुष्यात चाललेल्या घडामोडी तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकताच त्याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आज त्याचा वाढदिवस आहे. तर त्याच्या मित्रपरिवाराने त्याला सरप्राईज देत वाढदिवस साजरा केला. पारंपारिकरित्या औक्षण करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यानंतर त्यांनी मजा-मस्ती करत केकही कापला. यावेळी त्याच्या मित्रपरिवारातील अभिनेत्री पूजा सावंत, गौरव तत्ववादी, रुचिरा सावंत, अभिनेता भूषण सावंत ही मंडळी उपस्थित होती.

View this post on Instagram

A post shared by VAIBHAV TATWAWADI (@vaibhav.tatwawaadi)

आणखी वाचा – सायली नाहीतर ही सुद्धा निवेदिता-अशोक सराफ यांची मानसकन्या? “मला तुझा अभिमान…”, निवेदिता सराफ यांनी शेअर केलेला व्हिडिओ चर्चेत

हा व्हिडिओ शेअर करत त्याने लिहीलं, ‘सूर्याभोवती आणखी एक फेरी. साहसी, धडे आणि प्रेमाच्या आणखी एका वर्षासाठी मी कृतज्ञ आहे. प्रत्येक क्षण जगण्यासाठी व येणाऱ्या सर्व गोष्टी कवेत घेण्यासाठी मी इथे आहे. शुभेच्छासाठी व माझ्या या प्रवासाचा भाग असण्यासाठी धन्यवाद. माझ्या आयुष्यातील त्या प्रत्येक क्षणासाठी, प्रेमासाठी व आठवणींसाठी मी कृतज्ञ आहे’, असं व्हिडिओला कॅप्शन देत त्याने आपल्या मित्रपरिवाराचे आभार मानले.  

View this post on Instagram

A post shared by VAIBHAV TATWAWADI (@vaibhav.tatwawaadi)

आणखी वाचा – ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’च्या सेटवर फावल्या वेळेचा केला जातो असा वापर, अभिनेत्रीने शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक, कमेंटचा वर्षाव करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या व्हिडिओवर कलाकरांनीही कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत लिहिलं, ‘आमच्या पिढीला सतत प्रेरणा दिल्याबद्दल आणि आम्हाला प्रेरित करण्यासाठी बेंचमार्क सेट केल्याबद्दल धन्यवाद’, असं म्हणत त्याला एका वेगळ्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहे.   

Tags: birthday celebrationfriend circlemarathi actorvaibhav tatwawadivideo goes viral
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Virat Kohli Fitness
Lifestyle

वाढतं वजन, धावायलाही अवघड, स्वतःचीच लाज वाटू लागली अन्…; विराट कोहलीने असं कमी केलं वजन

मे 15, 2025 | 7:00 pm
navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Next Post
Prajakta Mali share a story during Teen Adkun Sitaram shoot

"म्हणून मी आलोकला…" प्राजक्ता माळीने सांगितला लंडनमधील शूटिंगदरम्यानचा किस्सा, म्हणाली, "अर्धा तासाचा माझा शॉट…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.