शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“खूप लोकांना गमावलं…”, सरत्या वर्षाला निरोप देताना ‘पारू’ फेम अहिल्यादेवी भावुक, सांगितला अनुभव

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 25, 2024 | 12:48 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
mugdha karnik instagram post

'पारू' फेम मुग्धा कर्णिकचा सरत्या वर्षाला निरोप

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ ही मालिका सध्या खूप प्रकाशझोतात आहे. या मालिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे. या मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत. पारू-आदित्य या जोडीला विशेषतः खूप प्रेम मिळत आहे. मात्र ‘पारू’ मालिकेतील अशी एक भूमिका आहे जिने प्रेक्षकांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ही भूमिका म्हणजे अहिल्यादेवी किर्लोस्कर. मालिकेतील मुख्य अभिनेत्याची आई म्हणजे अहिल्यादेवी. ही भूमिका मुग्धा कर्णिक या गुणी अभिनेत्रीने साकारली आहे. करारी नजर, चेहऱ्यावरुन कठोर पण तितकीच प्रेमळ आई. अशा विविध छटा मुग्धाच्या अभिनयातून सहजतेने दिसून येतात. (mugdha karnik instagram post)

अहिल्यादेवी म्हणून प्रसिद्ध असलेली मुग्धा सोशल मीडियावरदेखील कमालीची सक्रिय असलेली बघायला मिळते. २०२४ हे वर्ष संपायला काही दिवसच बाकी आहेत. या निमित्ताने मुग्धाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. मुग्धाने पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, “ २०२४ हे खूप आठवणीत राहणारे वर्ष ठरले आहे. या वर्षाने मला खूप काही दाखवले आणि नंतर मी पुन्हा सगळ्यातून सावरलेदेखील. मी माझ्या आयुष्यातील अनेक चढउतार यावर्षी पाहिले पण माझ्या आयुष्यातील हा सर्वात परिपूर्ण अनुभव होता. काही लोक गमावले आणि नवीन कमावले”.

आणखी वाचा -२०२४मध्ये काही कलाकारांचं दुर्देवी निधन, तर काहींनी आई व वडिलांनाही गमावलं, कठीण प्रसंगांचा हिंमतीने सामना

View this post on Instagram

A post shared by Mugdha Karnik (@mugdha_karnik)

पुढे तिने लिहिले की, “सामर्थ्य आणि लवचिकता हे २०२४  मध्ये मला अनुभवायला मिळाले. २०२५ मध्ये प्रवेश करेन ते माझ्यासाठी आनंदाचे आहे. पण मला माझ्या जुन्या प्रवृत्तींशी लढण्यासाठी शक्तीची गरज आहे. ज्या प्रकारे मी लोकांना पाहते, लोकांवर प्रेम करते पण मला तितके महत्त्व मिळत नाही. त्यामुळे २०२५ मध्ये मी स्वतःवर अधिक प्रेम करेन. जगण्यासाठी आणि वाढण्यास आणि स्वतःसाठी मी सक्षम होऊन आले आहे”. दरम्यान मुग्धाची ही पोस्ट चांगलीच चर्चेत राहिली आहे.

आणखी वाचा – लग्नाला एक वर्ष पूर्ण होताच प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायनचं जोरदार सेलिब्रेशन, खास रोमॅंंटिक डेट अन्…; Photo Viral

मुग्धाने शेअर केलेल्या या पोस्टला चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली आहे. तसेच आयुष्यातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छादेखील दिल्या आहेत. ‘पारू’ या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं आहे. सध्या ही मालिका तिच्या कथानकामुळे गाजत आहे. या मालिकेतील पात्रांवरही प्रेक्षक प्रेम करताना दिसत आहेत. मालिकेत सध्या पारूचा खडतर प्रवास आणि या प्रवासात आलेल्या संकटाना तोंड देत तिची लढाई पाहणं रंजक ठरत आहे. या मालिकेत पारू ही भूमिका अभिनेत्री शरयू सोनावणे साकारत आहे. 

Tags: ahilyadevi kirloskarmugdha karnikpaaru serialsocial media post
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
kaumudi walokar haldi ceremony

ना अवाढव्य खर्च, ना महागडे कपडे, 'आई कुठे…' फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीला लागली हळद, साधेपणाची चर्चा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.