मराठी मनोरंजन क्षेत्रातील मुग्धा वैशपायन व प्रथमेश लघाटे ही लोकप्रिय जोडी आहे. प्रथमेश व मुग्धा यांच्या मधुर आवाजाने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात दोघांचाही मोठा चाहतावर्ग आहे. याबरोबरचे भारताबाहेरही अनेक कार्यक्रम करताना दिसतात. त्यांच्या परदेशातील कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दीदेखील बघायला मिळते. नुकताच त्यांचा ऑस्ट्रेलिया दौरा चांगलाच चर्चेत राहिला होता. यावेळी त्यांनी अनेक फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केले होते. सोशल मीडियाद्वारे हे दोघे त्यांच्याबद्दलचे अनेक अपडेट्स चाहत्यांना देत असतात. ते दोघं गाण्याचे अनेक कार्यक्रम एकत्र करतातच, त्याबरोबरच ते एकत्र असले की एखादा गाण्याचा व्हिडिओही बनवतात आणि तो सोशल मीडियावर पोस्ट करतात. (prathmesh laghate-mugdha vaishampayan first wedding anniversary)
अशातच मुग्धा व प्रथमेश यांच्या एका पोस्टने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. दोघांच्याही लग्नाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेयर करत आनंद साजरा केला आहे. मुग्धा व प्रथमेश यांनी काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्यांनी एकमेकांबरोबरचे गोड क्षण साजरे करताना दिसत आहेत. तसेच यामध्ये या लाडक्या जोडीचा खूप साधा पण लक्षवेधी लूक बघायला मिळत आहे. या जोडीने त्यांच्या लग्नाचा वाढदिवस खूप साधेपणाने एका रिसॉर्टमध्ये साजरा केला आहे. यामध्ये दोघांनीही साध्या व चविष्ट अन्नाचा आस्वाद घेतला आहे.
तसेच काही फोटोंमध्ये आजूबाजूचे निसर्गसौंदर्यदेखील दिसून येत आहे. तसेच हे फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, “असा साजरा केला आम्ही आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस”. दरम्यान मुग्धा व प्रथमेश यांच्या पोस्टला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. तसेच त्यांच्या चाहत्यांनीदेखील लग्नाच्या वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान गेल्या वर्षी त्यांनी ‘आमचं ठरलं’ म्हणत एकत्र फोटो शेअर करत मुग्धा व प्रथमेशने त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. त्यानंतर दोघांच्या साखरपुडा, व्याहीभोजनाचे फोटोही समोर आले होते. त्यानंतर त्यांचे थोरा-मोठ्यांच्या आशीर्वाने लग्न पार पडलं होतं. त्यांच्या लग्नाचे फोटो व व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.