मराठी कलाविश्वात यंदाच्या वर्षात अनेक घडामोडी झाल्या. यांमध्ये काही कलकारांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यांचं अचानक निघून जाणे हे चाहत्यांसाठीही धक्कादायक होतं. २०२४ या वर्षात अभिनेते अतुल परचुरे, उद्योजक रतन टाटा, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या आई, ज्येष्ठ अभिनेते विजय कदम, बिग बॉस मराठी फेम जय दुधानेचे वडील तसंच अभिनेत्री मेघना एरंडेचे वडील यांनी या जगाचा निरोप घेतला. (Atul Parchure, Ratan Tata, Vijay Kadam passed away in the year)
- अतुल परचुरे : आपल्या दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टी, रंगमंच आणि टीव्ही मालिका गाजवणारे अभिनेते अतुल परचुरे यांचं १४ ऑक्टोबर २०२४ ला निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. काही काळापूर्वी त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. कर्करोगावर यशस्वीरित्या मात करून ते पुन्हा रंगभूमीवर काम करण्यास सज्ज झाले होते. मात्र पुन्हा बळावलेल्या आजारामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. अतुल परचुरे यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली.
- मृणाल कुलकर्णी आई : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि लेखिका मृणाल कुलकर्णी यांच्या आई वीणा देव यांचं मंगळवार २९ ऑक्टोबर रोजी निधन झालं. वयाच्या ७६व्या वर्षी वीणा देव यांनी जगाचा निरोप घेतला. वीणा देव सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक गो.नी. दांडेकर यांच्या त्या कन्या होत्या. वीणा देव यांनी ‘कधीकधी’, ‘परतोनी पाहे’, ‘स्त्रीरंग’, ‘विभ्रम’, ‘स्वान्सीचे दिवस’ ही पुस्तके लिहिली.
- विजय कदम : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांनी १० ऑगस्ट २०२४ रोजी या जगाचा निरोप घेतला. विजय कदम हे गेले दीड वर्षांपासून कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. विजय कदम यांनी चष्मेबहाद्दर, पोलीसलाईन, हळद रुसली कुंकू फसल, आम्ही दोघे राजा राणी अशा चित्रपटांमध्ये त्यांना भूमिका केली. विजय कदम यांच्या निधनामुळे अवघ्या मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली.
- जय दुधाणे वडील : ‘बिग बॉस फेम’ अभिनेता जय दुधाणे २४ जून २०२४ रोजी निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर जयने डिलांचा फोटो पोस्ट करत मी माझा सुपरहिरो गमावला… अशी भावूक करणारी पोस्ट लिहिली होती. २४ जूनच्या मध्यरात्री कार्डियाक अरेस्टमुळे जयच्या वडिलांनी जगाचा निरोप घेतला. या काळात त्याला अनेकांनी धीर देण्याचा प्रयत्न केला.
- मेघना एरंडे वडील : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मेघना एरंडेच्या वडिलांनी या वर्षात अखेरचा निरोप घेतला. भिनेत्रीच्या वडिलांचं २७ फेब्रुवारीला पुण्यात निधन झालं. सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत मेघनाने ही दु:खद बातमी सर्वांना सांगितली होती. अभिनेत्रीच्या वडिलांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी तिच्या पोस्टवर कमेंट करत श्रद्धांजली अर्पण केली.
- रतन टाटा : २०२४ या वर्षात अनेकांच्या जीवाला चटका लावणारी आणखी एक दु:खद घटना घडली ती म्हणजे रतन टाटा यांचे निधन. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र २७ ऑक्टोबर रोजी रात्री उशिराने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनावर देशभरातून दु:खद प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या.