सध्या मराठी मनोरंजन क्षेत्रात अनेक जोड्या लग्नबंधनात अडकत आहे. २०२४ या वर्षात अनेक लाडक्या कलाकारांनी लग्नगाठ बांधली आहे. अशातच आता ‘आई कुठे काय करते?’ फेम अभिनेत्री लवकरच लग्न करणार आहे. लग्नाआधीच्या सर्व विधींना सुरवात झाली असून तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर बघायला मिळत आहेत. ‘आई कुठे…’मालिकेतील आरोही, अर्थात अभिनेत्री कौमुदी वलोकर. कौमुदीच्या घरी लगीनघाई सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे आणि तिच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवातही झाली आहे. याची खास झलक तिने सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. कौमुदीचे काही खास फोटो समोर आले आहेत. काल तिच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो चांगलेच चर्चेत राहीले. (kaumudi walokar haldi ceremony)
अशातच आता कौमुदीच्या हळदीचे सुंदर फोटो समोर आले आहेत. कौमुदीच्या इन्स्टाग्राम पेजवर तिच्या हळदी सोहळ्याची झलक बघायला मिळत आहे. यामध्ये अभिनेत्रीने सुंदर असा गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तसेच तिच्या हातावरील मेहंदीलाही रंग चढलेला दिसत आहे. कौमुदीच्या गालाला, हाताला व पायाला हलकी अशी हळददेखील लागलेली दिसून येत आहे.
कौमुदीने शेअर केलेल्या फोटोमध्ये फुलांची केलेली खास सजावट लक्ष वेधून घेत आहे. छान कमळाची प्रतिकृति असलेले बसण्यासाठी करण्यात आले आहे. त्यावर फुलांची सजावट, तसेच मागे भिंतीवर सुंदर आशा मोगऱ्याच्या माळा, टोपलीमध्ये केलेली गोंड्याच्या फुलांची छान सजावट आणि समईला केलेली फुलांची सजावट यामुळे हळदी समारंभाची शोभा अधिकच वाढली आहे. तसेच कोणताही तामझाम न करता अत्यंत साधेपणाने केलेली हळद प्रेक्षकांच्या अधिक पसंतीस पडत आहे.
कौमुदीने गेल्यावर्षी साखरपुडा केला होता. आता ती लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. आकाश असं कौमुदीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे. कौमुदी आकाशबरोबर लवकरच संसार थाटणार आहे. अद्याप तिच्या लग्नाची तारीख समोर आलेली नाही. पण तिच्या लग्नाची अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे. तिचे चाहते मंडळी या लग्नाची वाट बघत आहेत.