गेले काही दिवस हिंदीसह मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार विवाहबंधनात अडकत आहेत. मराठी मनोरंजन विश्वातील अमृता-प्रसाद, सुरूची-पियुष या जोड्यांनंतर नुकतंच गायिका मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे हे दोघेही विवाहबंधनात अडकले. अशातच आता आणखी एका अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. ते म्हणजे अभिनेत्री गौतमी देशपांडे. गौतमी व स्वानंद दोघेही रिलेशनमध्ये होते आणि आता ते लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे. (Mrunmayee Deshpande On Instagram)
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे व धाकटी बहीण गौतमी या दोघी सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. या दोन बहिणींचा एकमेकींबरोबरचा बॉण्ड हा खूपच खास आहे. ‘माझा होशील ना?’ या मालिकेमुळे गौतमी घराघरांत पोहोचली. मालिका संपल्यानंतरही तिची लोकप्रियता कायम आहे. या दोघी बहिणी त्यांचे धम्माल मस्तीचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या पोस्टवर चाहतेदेखील भरभरून कमेंट करत असतात. अशातच मृण्मयीने एक व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा – शाहरुख खानच्या ‘डंकी’ व प्रभासच्या ‘सालार’चं ऑनलाइन लिकमुळे मोठं नुकसान, निर्मात्यांना बसणार मोठा फटका
मृण्मयीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर केळवणाचा एक व्हिडिओ शेअर केला असून हा व्हिडीओ गौतमीच्या केळवणाचा असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. गौतमीचे लग्न ठरले असून तिच्या केळवणाला सुरुवात झाली असल्याचे दिसत आहे. गौतमी देशपांडे व स्वानंद तेंडुलकर हे दोघे रिलेशनमध्ये असल्याचा चर्चा रंगल्या होत्या आणि आता ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याचेदेखील म्हटले जात आहे. त्यामुळे मृण्मयीने लाडक्या बहिणीच्या केळवणाची जय्यत तयारी केल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये ताटाभोवती फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच कुटुंबियांचा चांगलाच उत्साह पाहायला मिळत आहे.
दरम्यान, गौतमीच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ‘माझा होशील ना?’ या मालिकेनंतर ती रंगभूमीकडे वळली. सध्या ती ‘गालिब’ या नाटकातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तर स्वानंद हा ‘भाडिपा’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर कंटेंट क्रिएटर म्हणून कार्यरत आहे. तसेच दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात.