मराठी अभिनेते आदेश बांदेकर हे खूप लोकप्रिय आहेत. त्यांनी आजवर अनेक मराठी मालिका, चित्रपट व नाटकांमध्ये काम केले आहे. त्यांच्या सर्वच भूमिकांना प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे. त्यांच्याबरोबरच त्यांची पत्नी सूचित्रा बांदेकरदेखील चित्रपट व मालिकांमध्ये काम करताना दिसतात. त्याचप्रमाणे त्यांचा मुलगा सोहम बांदेकरदेखील मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. तो नुकताच ‘कलर्स वाहिनी’वरील ‘सुख कळले’ या मालिकेचा निर्माता म्हणून काम करत होता. या मालिकेमध्ये अभिनेत्री स्पृहा जोशी मुख्य भूमिकेत दिसून आली होती. आदेश हे सोशल मीडियावरदेखील अधिक सक्रिय असलेले बघायला मिळतात. नुकताच त्यांनी वडिलांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. (aadesh bandekar father video)
आदेश यांचे वडील चंद्रकांत यशवंत बांदेकर यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर त्यांनी व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आदेश यांचे वडील एक कविता म्हणताना दिसत आहेत. आदेश यांनी हा व्हिडीओ शेअर करत “माझे वडील चंद्रकांत यशवंत बांदेकर. वय ९२ वर्ष. इयत्ता चौथीमध्ये शिकलेली कविता आजही तोंडपाठ आहे”.
या व्हिडीओमध्ये आदेश यांचे वडील ‘कोंबडा’ ही कविता तालासुरात गाताना दिसत आहेत. पहिली दुसरीच्या पाठ्यपुस्तकातील ही कविता आजही त्यांची तोंडपाठ आहे. “कोणा आवडतो मोर पिसाऱ्याचा, असे कोणाला छंद कोकिळेचा, कोणी नसतो नादिष्ट पोपटाचा, मला आहे परि नाद कोंबड्याचा’असे त्या कवितेचे बोल आहेत. दरम्यान ही कविता प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडली आहे. तसेच चाहत्यांनी या कवितेला खूप पसंतीदेखील दर्शवली आहे. तसेच त्यांच्या स्मरणशक्तीचेही सगळ्यांनी कौतुक केले आहे.
आदेश बांदेकर हे मनोरंजन क्षेत्रासह राजकारणातही तितकेच सक्रिय आहेत. रंगभूमी, होम मिनिस्टर आणि याशिवाय राजकीय कार्यक्रम यानिमित्ताने आदेश यांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी ते प्रवास करत असतात. महाराष्ट्रासह भारतभर आणि भारताबाहेरही ते जात असतात. याच प्रवासादरम्यानचे अनुभव, किस्से, काही खास आठवणी ते सोशल मीडियावर शेअर करत असतात.