बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर हा नेहमीच चर्चेत असलेला बघायला मिळतो. गेले बराच काळ तो चित्रपटसृष्टीपासून दूर असलेला दिसून येत आहे. अशातच आता त्याचा ‘देवा’ हा बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचा दमदार टीजर प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. त्यानंतर शाहिद व पूजा हेगडे यांचे एक गाणे देखील प्रेक्षकांच्या भेटीस आल होते. या गाण्याला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती. यामध्ये शाहिदचा जबरदस्त अंदाज बघायला मिळत आहे. आशातच आता या चित्रपटाचा दमदार ट्रेलर बघायला मिळत आहे. या ट्रेलरमध्ये शाहिदचा एक वेगळाच अवतार दिसून येत आहे. (deva trailer launch)
‘कमिने’ या चित्रपटात शाहिदचा एक रावडी अवतार बघायला मिळाला होता. या चित्रपटातदेखील तसाच काहीसा लूक बघायला मिळत आहे. ‘देवा’ या चित्रपटात शाहिद देव अंबरे ही भूमिका साकारताना दिसत आहे. यामध्ये जबरदस्त फाईट सीन बघायला मिळत आहेत. यामध्ये शाहिदबरोबर पूजादेखील दिसून येत आहे. याव्यतिरिक्त यामध्ये कुब्रा सेठ व पवन गुलाटी असे लोकप्रिय कलाकर दिसून येत आहेत. समोर आलेल्या ट्रेलरमध्ये शाहिद अँक्शन सीन करताना दिसत आहे. तसेच त्याच्या तोंडी असलेले संवाददेखील लक्षवेधी ठरत आहेत.
‘देवा’चे चांगले व्हिज्युअल्स लक्षवेधी ठरत आहेत. तसेच या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफीदेखील उत्तम दिसत आहे. प्रत्येक प्रत्येक पात्राची विशेष ओळख करुन देण्यात आली आहे. बॅकग्राऊंड म्युजिकदेखील रंजक दिसत आहे. तसेच पुढे काय होणार? याची उत्सुकता वाढवत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोशन अँड्रयूज यांनी केले आहे. तसेच झी स्टुडिओ व रॉय-कपूर फिल्म अंतर्गत चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. हा चित्रपट ३१ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
शाहिदच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, त्याचा गेल्यावर्षी ‘तेरी बातो मे ऐसा उलझा जीया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये त्याच्याबरोबर अभिनेत्री क्रिती सेनॉन दिसून आली होती. तसेच ‘ब्लडी डॅडी’, ‘जर्सी’, ‘कबीर सिंह’, ‘उडता पंजाब’, ‘रंगून’ हे चित्रपट भेटीस आले होते.