Appi Amchi Collector : झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी माझी कलेक्टर’ या मालिकेला अमोलच्या आजारपणामुळे एक वेगळच वळण आलं आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेत अमोलच्या हट्टापायी अर्जुन व अप्पी यांनी लग्नाचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आनंदी वातावरण होते. अमोलच्या आजारपणाचे संकट असतानाच आता अप्पी-अर्जुन यांच्या आयुष्यात एक आणखी नवीन संकट येणार आहे. अप्पी-अर्जुनच्या आयुष्यातील संकटे काही कमी होत नाहीयेत. एकामागून एक संकटे त्यांच्या आयुष्यात येत आहेत. अशातच आता नवीन संकट येणार आहे आणि या नवीन संकटाचा प्रोमोही नुकताच शेअर करण्यात आला आहे. झी मराठीच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे हा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. (Appi Amchi Collector Serial Update)
या नवीन प्रोमोमध्ये अप्पीच्या दारावर जोगतीन जोगवा मागायला येते. तेव्हा अप्पी तिला जोगवा देत असताना “कुलदैवतेला कधी पूजलं होतंस?” असं विचारते. यावर अर्जुनचा भाऊ “बरेच दिवस झाले” असं त्या जोगतीनीला म्हणतो. यावर जोगतीन त्यांना या घरावर संकट येणार असल्याचा इशारा देते. पुढे एका पूजेनिमित्त गुरुजी अर्जुनला पूजेला कोण बसणार आहेत असं विचारताना दिसत आहेत. त्यानंतर अर्जुन मी आणि माझी मंडळी असं उत्तर देते. त्यावर ते गुरुजी त्याला “मुहूर्त गेला तर अपशकुन होईल” असं म्हणतात. त्यावर अर्जुन त्यांना “लवकरच ते येतील” असं म्हणतात.
पुढे अप्पी गाडीतून प्रवास करताना वाटेत एक मुलगा आडवा येतो. तेव्हा अप्पी चालकाला गाडी डावीकडे घेण्यास सांगते. तेव्हा चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटते आणि ती गाडी एका खोल दरीत जाऊन कोसळते. तसंच हे अपघात होताना अप्पीचा घाबरलेला चेहरा या नवीन प्रोमोमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता हा अपघात नक्की अप्पीचा झाला आहे का? हे आगामी भागात प्रेक्षकांना पाहता येणार आहे. “अप्पी अर्जुनच्या कुटुंबावर ओढवणार नवं संकट…” असं म्हणत हा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
दरम्यान, मालिकेत जीजी या पात्राची एन्ट्री झालेल्या पाहायला मिळाली आहे. त्याला अटक केल्यानंतर त्याने अप्पी व अर्जुन यांचा बदला घेणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे आता हा बदला घेण्यासाठी त्याने हा डाव खेळला असेल का? या अपघाताचा अप्पीशी काही संबंध असेल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तर येत्या भागातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.