बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“…अन् घरात उदरांनी अन्नाची नासाडी केली”, चाळीत राहणाऱ्या ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्रीने सांगितलेला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “बाबांना वाईट…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 8, 2023 | 3:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Snehal told story about food

Snehal told story about food

महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या विनोदी कार्यक्रमांपैकी एक म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’. झी मराठीवरील या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. यातील सगळी कलाकार मंडळीही प्रेक्षकांची बरीच लाडकी आहेत. सर्व कलाकारांनीही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकलीत. कलाकार प्रत्येकवेळी वेगवेगळ्या भूमिकांसह नवीन काहीतरी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. कलाकारांबाबत जाणून घ्यायला प्रेक्षक नेहमी उत्सुक असतात. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्याची वेगळी अशी गोष्ट असते. अशीच गोष्टी ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाच्या कलाकार स्नेहल शिदमचीही आहे.(Snehal told story about food)

स्नेहलने आजपर्यंत कार्यक्रमात सगळ्या विनोदी भूमिका अगदी सहजपणे साकारल्यात. पण जेवढ्या सहजतेने तिने या भूमिका साकरल्या तितकं सहज तिचं आयुष्य नव्हतं. याबाबत खुलासा करताना तिने ‘इट्स मज्जा’च्या ‘माझ्या घराची गोष्ट’ या कार्यक्रमात मुलाखतीत तिच्या आयुष्यातील प्रवासबाबत सांगितलं.“आम्ही आतापर्यंत चाळीतल्या घरात राहत आलो आहोत पण हे घर घ्यायच्या अगोदर आम्ही एका भाड्याच्या घरात राहत होतो. मुंबई जेव्हा पाण्याखाली गेली होती तेव्हा अगदी आमचंही घर दिसत नव्हतं. तेव्हा आमच्यासमोर वेगळी आव्हाने होती”.

वाचा – काय घडलं होतं नेमकं स्नेहलच्या घरी?(Snehal told story about food)

आणखी वाचा – “पहिल्यांदाच मासिक पाळी आल्यानंतर बाबांजवळ गेले अन्…”, अतिशा नाईकने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “त्यांनी मला कधीही…”

पुढे तिने सांगितलं, “मी त्याकाळात डान्सचे कार्यक्रम करायचे. एकदा माझ्याबरोबर सगळेच डान्सच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. घरी कोणीही नव्हतं. आम्ही घरी जेवण बनवून गेलो होतो. पण जेव्हा आम्ही घरी आलो तेव्ही घरभर जेवणाची नासाडी झाली होती”.परिस्थितीचा उलघडा करत ती म्हणाली, “ हा सगळा प्रकार आम्ही घरी नसताना उंदिरांनी केला होता. चाळी म्हटली की उंदरांचा वावर आलाच. आम्ही कोणीच घरी नाही म्हणून उंदरांनी सगळं अन्न घराभर नासाडी केलं होतं”.

View this post on Instagram

A post shared by Snehal Shidam (@snehalshidam)

आणखी वाचा – “माझ्या आईच्या चारित्र्यावर तेव्हा…”, काळ्या रंगावरुन हिणावणाऱ्यांना अतिशा नाईकचं सडेतोड उत्तर, म्हणाली, “गोरं होण्यासाठी…”

अन्नाची झालेली नासाडी बघून स्नेहलच्या बाबांना खूप वाईट वाटलं होतं. तेव्हा त्यांनी विचार केला की आज मुलांच्या समोरील अन्न गेलं आहे. हे पुन्हा होता नये म्हणून काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर त्यांनी कोणत्याही परिस्थितीत हे घर दुरुस्त करण्याचं ठरवलं आणि आताची वास्तू उभी आहे”.स्नेहल आज चला हवा येवू द्या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचली आहे. तिचा अभिनय लोकांना खूप आवडतो. तिने स्वतःची वेगळी ओळख या क्षेत्रात निर्माण केली आहे.

Tags: chala hava yeu dyafame snehal shidamMarathi programreal life story
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
Neha gadre shift out of india

मराठी मालिकांमध्ये काम करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री आता दिसते अशी, लग्न करुन परदेशात गेली अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.