शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझ्या आईच्या चारित्र्यावर तेव्हा…”, काळ्या रंगावरुन हिणावणाऱ्यांना अतिशा नाईकचं सडेतोड उत्तर, म्हणाली, “गोरं होण्यासाठी…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 2, 2023 | 3:59 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Atisha Naik Interview Majjacha adda

अतिशा नाईक मज्जाचा अड्डा मुलाखत

Majjacha Adda with Atisha Naik : कलाक्षेत्रामध्ये काम करत असताना कलाकार मंडळींना विविध प्रश्नांचा सामना करावा लागतो. काम मिळवण्यासाठी कलाकारांचं सुरु असलेला संघर्ष व त्यादरम्यानचे अनुभव अनेकांनी ऐकले आहेत. आजही चेहऱ्याचा रंग किंवा बोल्ड भूमिकांना नकार दिल्यामुळे अनेक अभिनेत्रींच्या हातून भूमिका जातात. असाच काहीसा प्रकार अभिनेत्री अतिशा नाईकबरोबरही घडला आहे. याचबाबत तिने आता खुलासा केला आहे.

‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ कार्यक्रमात अतिशाने हजेरी लावली होती. यावेळी तिने अनेक विषयांवर दिलखुलासपणे भाष्य केलं. दरम्यान अतिशाला “तू काळी आहेस म्हणून तुला भूमिका मिळाल्या नाहीत, चित्रपटासाठी तुला फार विचारणा होत नाही” असं विचारण्यात आलं. यावेळी तिने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर दिलं.

आणखी वाचा – “पहिल्यांदाच मासिक पाळी आल्यानंतर बाबांजवळ गेले अन्…”, अतिशा नाईकने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “त्यांनी मला कधीही…”

अतिशा म्हणाली, “इतर कोणाबरोबर काही घडलं तर मला दोन मिनिटांसाठी वाईट वाटतं. तुम्ही त्या व्यक्तीचं काम पाहिलं पाहिजे. का तुम्ही असं करता?. दुसरं म्हणजे माझे आई-बाबा सावळे होते. मी गोरी झाली असते तर माझ्या आईच्या चारित्र्यावर शिंतोडे उडाले असते. त्यामुळे माझं म्हणणं आहे की, मी काळी-सावळी जशी आहे तशी चांगली आहे. माझ्या शरीराचा जो रंग आहे त्यामध्ये मी खूश आहे. एकदाही मी गोरं होण्यासाठी कोणतीच क्रिम वापरली नाही. माझी आजी गोरी होती. पण मी कोणत्याच प्रकारचा भेदभाव करत नाही. मी काळी आहे की गोरी जर तुम्हाला नसेल आवडत तर तो तुमचा प्रश्न आहे”.

आणखी वाचा – “माझ्या मुलीला बघून एकाची लाळ गळत होती अन्…”, अतिशा नाईकचा खुलासा, म्हणाली, “छेड काढली…”

“बोल्ड भूमिकांसाठी अंगप्रदर्शन करणार का? असंही विचारण्यात आलं. पण माझे कुटुंबीय, माझा मित्र परिवार, त्यांचे आई-बाबा माझं काम प्रेमाने बघतात. अतिशा आहे तर आम्हाला दाखव ती नवीन काय करत आहे असं विचारतात. त्यावेळी त्यांना मला स्क्रिनवर बघताना मान खाली घालण्याची वेळ येऊ नये. पण अशाप्रकारचे सीन जे लोक करतात ते चुकीचे आहेत का? तर माझ्यामते नाही. त्यांना योग्य वाटतं ते करतात. मला ते योग्य वाटत नाही म्हणून मी करत नाही. पुढे कधी मला योग्य वाटलं तर असे सीन मी करेन. पण त्यापूर्वी बोल्ड सीन करणं खरंच भूमिकेची गरज आहे का? हे मी बघेन”. अतिशाच्या उत्तराने सगळ्यांची मनं जिंकली आहेत.

Tags: atisha naikmarathi actressmarathi moviemarathi serial
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Jailer OTT Release

मोठा पडदा गाजवल्यानंतर रजनीकांतचा 'जेलर' येणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर, कधी व कुठे पाहता येणार चित्रपट?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.