लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस १३’ ची स्पर्धक आरती सिंह लवकरच तिच्या आयुष्याच्या एका नवीन पर्वाला सुरुवात करणार आहे. काही दिवसांपूर्वी तिचा भाऊ कृष्णा अभिषेकने आरतीच्या लग्नाबाबतची मोठी बातमी शेअर केली होती. तेव्हापासून आरती तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आहे. यावेळी त्याने खुलासा केला की, आरती तिचा प्रियकर दिपक चौहानसह लग्न करणार असल्याचे सांगितले होते. अशातच आता तिच्या लग्नाची तारीखदेखील समोर आले आहे.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने काही खास फोटो शेअर करत नवीन सुरुवात झाली असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता तिच्या लग्नाची तारीखदेखील समोर आली आहे. ‘ईटाईम्स’च्या वृत्तानुसार, आरती सिंह येत्या २५ एप्रिल रोजी दीपक चौहानबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे. यादरम्यान काही मीडिया रिपोर्टनुसार, त्यांच्या हळदी-मेहंदी व संगीत समारंभ यांसारखे प्री-लग्नाआधीच्या विधींनादेखील लवकरच सुरुवात होणार असल्याचे म्हटले जात आहे.
आणखी वाचा – “अशोक सराफ यांच्यामुळे शिस्त लागली”, श्वेता शिंदेने शेअर केली ‘ती’ आठवण, म्हणाली, “वेळेचं महत्त्व…”
‘नवभारत’च्या वृत्तानुसार, आरती व दीपक यांचे हे लग्न अरेंज मॅरेज असून त्यांची भेट एका खासगी मॅचमेकरमार्फत झाली होती. त्यानंतर २३ जुलैला ते एकमेकांना भेटले. त्यांतर ते दोघे पुन्हा दीपकच्या वाढदिवसानंतर (५ ऑगस्ट) भेटले. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात दोघांनी आपले नाते पुढे घेऊन जाण्याचा विचार केला. त्यानंतर १ जानेवारी रोजी दीपकने दिल्लीतील आरती सिंहच्या गुरुजींच्या मंदिरात अंगठी घालून लग्नाची मागणी घातली होती आणि त्यावर आरतीनेदेखील त्याला होकार दिला होता.
आणखी वाचा – “त्याने दोन गोष्टी नाही केल्या तरी…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं रोखठोक मत, म्हणाली, “हा फरक…”
दरम्यान, आरती लग्नानंतर हनिमूनला न् जाता देवदर्शनासाठी जाणार असल्याचे म्हटले आहे., त्याचबरोबर ती तिचे नवीन घर खरेदी करणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच आरतीने तिचे मामा गोविंदा यांनाही लग्नाची गोड बातमी दिली आहे. अभिनेत्रीने तिच्या मामालाही लग्नाबद्दल सांगितले आणि ते तिच्यासाठी आनंदी आहेत. त्यामुळे गोविंदा आरतीला आशीर्वाद देण्यासाठी येणार असल्याचे म्हटले जात आहे.