शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

डोक्याला जखम, रक्त वाहत होतं अन्…; कशाचीच पर्वा न करता सिद्धार्थ चांदेकरने पूर्ण केलं नाटक, बेशुद्ध पडेल अशी अवस्था होती पण…

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 5, 2024 | 4:02 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Siddharth Chandekar was injured in the head during a play see the details

डोक्याला जखम, रक्त वाहत होतं अन्...; कशाचीच पर्वा न करता सिद्धार्थ चांदेकरने पूर्ण केलं नाटक, बेशुद्ध पडेल अशी अवस्था होती पण...

आपल्या कसदार लिखाणाने  आणि सशक्त अभिनयाने कायमच चर्चेत राहणारा अभिनेता-लेखक म्हणजे चिन्मय मांडलेकर. चिन्मयने मराठी मालिकांमधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले केले. त्यानंतर काही मराठी मालिकांसाठी लिखाणदेखील केले. लेखन व अभिनयात रंगणाऱ्या या अभिनेत्याने मराठीसह हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.  ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटामधील बिट्टा कराटे ही त्याची खलनायकाची भूमिका चांगलीच गाजली. याशिवाय शिवराज अष्टकमधील त्यांनी साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेलादेखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले.

लेखन व अभिनय करणाऱ्या या कलाकाराचा प्रवास रंगभूमीपासून सुरु झाला असून या नाटकादरम्यानची एक भयानक घटना त्याने सांगितली आहे.चिन्मयने नुकतीच ‘झी नाट्य गौरव २०२४’ या सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी मराठीतील एका लोकप्रिय अभिनेत्याबरोबर झालेली एक भयंकर घटना सांगितली आहे. चिन्मयने अभिनेता सिद्धार्थ चांदेकरबद्दलची एक घटना सांगितली असून यानिमित्ताने त्याने त्याचे कौतुक करत त्याला ‘हॅट्स ऑफ’ असंही म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – “अशोक सराफ यांच्यामुळे शिस्त लागली”, श्वेता शिंदेने शेअर केली ‘ती’ आठवण, म्हणाली, “वेळेचं महत्त्व…”

यावेळी चिन्मयने ही आठवण सांगत असं म्हटलं आहे की, “नाटकादरम्यान अनेक गंमतीजमती किंवा किस्से होतंच असतात. पण माझी एक आठवण अशी आहे की, एका चालू नाटकादरम्यान, माझ्या एका सहकलाकाराच्या डोक्याला जखम झाली होती. ती भळभलती जखम घेऊन त्याने ते नाटक पूर्ण केले आणि तो सहकलाकार म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ चांदेकर”.

आणखी वाचा – गोविंदाची भाची आरती सिंह ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात?, लग्नाआधीच्या विधींना सुरुवात, अभिनेत्रीचा होणारा नवरा नेमकं काय करतो?

यापुढे त्याने असं म्हटलं की, “आम्ही ‘मग्न तळ्याकाठी’ या नाटकाचे प्रयोग करत होतो. तेव्हा ते नाटक खूप गाजलं होतं. तेव्हा एका प्रयोगामध्ये ब्लॅकआउटदरम्यान, सिद्धार्थला कुठे जायचं हे कळलं नाही आणि तो स्टेजवरुन खाली पडला आणि त्याच्या डोक्याला जखम झाली. त्याच्या डोक्याला लागलेल्या जखमेमधून रक्त वाहत होतं आणि ते रक्त इतकं होतं की, तो कधीही बेशुद्ध पडेल अशी भीती आम्हा सर्वांना वाटत होती. पण त्याने ती भळभळती जखम झालेली असतानाही उरलेलं नाटक पूर्ण केलं आणि प्रेक्षकांची दाद मिळवली. तर या हिंमतीसाठी त्याला माझ्याकडून हॅट्स ऑफ.”

Tags: marathi actormarathi entertainment newssiddharth chandekar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Virat Kohli Fitness
Lifestyle

वाढतं वजन, धावायलाही अवघड, स्वतःचीच लाज वाटू लागली अन्…; विराट कोहलीने असं कमी केलं वजन

मे 15, 2025 | 7:00 pm
navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Next Post
Pooja Bhatt On Marriage

दारुचं व्यसन, वडिलांबरोबरच किस आता ५२व्या वर्षी लग्न करणार आलिया भट्टची बहीण, म्हणाली, "जर नशिबात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.