शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

परदेशात पदवीधर झाला रवी जाधव यांचा लेक, यश पाहून आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना, म्हणाले, “अभिमान वाटतो कारण…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 7, 2024 | 11:51 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Marathi Director Ravi jadhav son ansh jadhav graduated from university of canada see the details

परदेशात पदवीधर झाला रवी जाधव यांचा लेक, यश पाहून आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना, म्हणाले, "अभिमान वाटतो कारण..."

आपली मुलं उत्तम शिकावीत, असं सर्वच पालकांना वाटतं आणि यासाठी प्रत्येक पालक आपल्या मुलांसाठी मेहनत घेत असतात. यासाठी अनेक पालक त्यांच्या मुलांना परदेशातही पाठवतात. कलाकार मंडळीदेखील त्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवत असतात. नुकतेच अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओकच्या मुलाचे शिक्षण परदेशात पूर्ण झाले. अभिनेत्याने मुलाच्या पदवी प्रदान सोहळ्याचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अशातच आणखी एका दिग्दर्शकाच्या मुलाचे परदेशात शिक्षण पार पडले असून तो आता पदवीधर झाला आहे.

दिग्दर्शक रवी जाधव यांचा मुलगा अंश जाधवने कॅनडातील एका मोठ्या कॉलेजमधून डिजीटल फ्युचर्समध्ये पदवी मिळवली आहे. त्यानिमित्ताने रवी जाधव यांनी लाडक्या लेकासाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या मुलाचं भरभरून कौतुक केलं आहे. रवी यांनी खास फोटो शेअर करत या फोटोखाली त्यांच्या आनंदी भावना व्यक्त करत असे म्हटले आहे की, “प्रत्येक पालकांसाठीचा अभिमानाचा क्षण! माझ्या मुलाने नुकतीच OCAD युनिव्हर्सिटी, कॅनडातून डिजीटल फ्युचर्समध्ये बॅचलर ऑफ डिझाईन (ऑनर्स) ही पदवी पूर्ण केली आहे. त्यामुळे पालक म्हणून आम्हाला (रवी व मेघना) खूपच आनंद झाला आहे”.

View this post on Instagram

A post shared by Ravi Jadhav (@ravijadhavofficial)

आणखी वाचा – “हात मिळवल्यानंतर त्याने…”, अंकिता लोखंडेला बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्याकडून घाणेरडी वागणूक, मोठा खुलासा करत म्हणाली, “त्याच्याकडून थोडं…”

यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “त्याला ही उत्कृष्ट कामगिरी करताना आणि त्याचं ध्येय साध्य करताना पाहणं हा आमच्यासाठी एक अविश्वसनीय प्रवास होता. आता त्याच्यासमोर त्याच्या आयुष्याचा पुढचा मोठा प्रवास आहे आणि खूप चांगल्या संधी त्याची वाट बघत आहेत. त्यामुळे यानिमित्ताने त्याला खूप साऱ्या शुभेच्छा”. रवी जाधव यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्सद्वारे शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमसह सिंगापूरमध्ये पोहोचली प्राजक्ता माळीची आई, माय-लेकींची धमाल मस्ती अन्…; अभिनेत्रीने शेअर केला सुंदर व्हिडीओ

दरम्यान, रवी जाधव यांनी ‘नटरंग’, ‘टाईमपास’, ‘न्यूड’, ‘बालगंधर्व’ यांसारख्या अनेक लोकप्रिय व हिट चित्रपटांतून आपल्या दिग्दर्शनाची छाप पाडली आहे. अशातच नुकत्याच दिग्दर्शित केलेल्या ‘मैं अटल हू’ मधून त्यांनी स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. त्यांच्या ‘ताली’ या सुष्मिता सेनच्या वेबसीरिजची प्रचंड चर्चा झाली. त्यामुळे त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगाही या सिनेसृष्टीत येणार की अशी आशा आता सर्वांनी व्यक्त केली आहे.  

Tags: entertainment newsmarathi directormarathi entertainment newsMarathi newsravi jadhavमनोरंजन बातमीमराठी दिग्दर्शकमराठी बातमीरवी जाधव
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Anushka sharma troll after banglore stampede
Entertainment

“खोटं रडू नकोस, इतके पैसे कमावले पण…”, बंगळूर चेंगराचेंगरीवर पोस्ट करताच अनुष्का शर्मा ट्रोल, नेटकऱ्यांचा संताप

जून 6, 2025 | 2:30 pm
 Celebs Live In Rented Houses
Entertainment

कोट्यवधी कमावतात तरीही कलाकार भाड्याच्या घरात का राहतात?, कारण ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या…

जून 6, 2025 | 1:30 pm
Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Next Post
Son Aniket shared a special post on social media to congratulate Ashok Saraf on receiving the Maharashtra Bhushan Award.

“माणूस म्हणून त्यांनी...”, लेकाला वडिलांचं कौतुक, अशोक सराफांच्या मुलाची भावुक पोस्ट, म्हणाला, “माझ्या वडिलांनी...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.